१८ ते ४४ वर्षे वयोगटाचे लसीकरण आज बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:08 AM2021-05-12T04:08:29+5:302021-05-12T04:08:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहराकरिता कोव्हॅक्सिन लसीचा मर्यादित साठा प्राप्त झाल्यामुळे बुधवारी शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांचे ...

Vaccination for 18 to 44 year olds stopped today | १८ ते ४४ वर्षे वयोगटाचे लसीकरण आज बंद

१८ ते ४४ वर्षे वयोगटाचे लसीकरण आज बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहराकरिता कोव्हॅक्सिन लसीचा मर्यादित साठा प्राप्त झाल्यामुळे बुधवारी शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण फक्त तीन केंद्रावर होणार आहे. यामध्ये स्व. प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि डॉ. आंबेडकर रुग्णालयाचा समावेश आहे.

लस उपलब्ध नसल्याने बुधवारी १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तीसाठी कोणत्याही केंद्रावर लसीकरण होणार नसल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

दरम्यान, मंगळवारी १२ केंद्रावर लसीकरण सुरू होते. १३७५ जणांना लस देण्यात आली. सहा केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील ८६८ जणांना लस देण्यात आली. तर इतर ठिकाणी २७६ जणांना दुसरा डोस देण्यात आला.

Web Title: Vaccination for 18 to 44 year olds stopped today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.