२३७ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:08 AM2021-04-06T04:08:04+5:302021-04-06T04:08:04+5:30
चिचाळा : जवळी (ता. भिवापूर) प्राथमिक आराेग्य केंद्रांच्या वतीने चिचाळा (ता. भिवापूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात साेमवारी (दि. ५) काेराेना ...
चिचाळा : जवळी (ता. भिवापूर) प्राथमिक आराेग्य केंद्रांच्या वतीने चिचाळा (ता. भिवापूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात साेमवारी (दि. ५) काेराेना लसीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. यात पहिल्याच दिवशी २३७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. प्रवीण राऊत यांनी दिली.
या लसीकरण केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसह ४५ ते ५९ वर्षे वयाेगटातील नागरिकांचे सक्तीने लसीकरण करण्यात आले. लस घेणाऱ्यांमध्ये चिचाळा, पाहमी व गरडापार या तीन गावांमधील नागरिकांचा समावेश आहे. खंडविकास अधिकारी माणिक हिमाने, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. प्रवीण राऊत, विस्तार अधिकारी प्रभाकर वाघ, सुनील महंतकर, महाजन यांनी या लसीकरण केंद्राला भेटी देऊन पाहणी केली. वैद्यकीय अधिकारी डाॅ. एन. सी. लाडेकर, आरोग्य सहायक एस. आर. पिपरे, आरोग्यसेविका रूपाली रामटेके यांनी लसीकरण कार्य पार पाडले. यावेळी सरपंच मनीषा पडोळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित हाेते.