पारशिवनी तालुक्यात ३८.७२ टक्के नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:08 AM2021-05-16T04:08:38+5:302021-05-16T04:08:38+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : पारशिवनी तालुक्यात बुधवारपर्यंत (दि. १२) सरासरी ३८.५२ टक्के नागरिकांचे काेराेना प्रतिबंधक लसीकरण करण्यात पूर्ण ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : पारशिवनी तालुक्यात बुधवारपर्यंत (दि. १२) सरासरी ३८.५२ टक्के नागरिकांचे काेराेना प्रतिबंधक लसीकरण करण्यात पूर्ण करण्यात आले. यात ५४.९२ टक्के नागरिकांना या लसीचा पहिला तर २२.५२ टक्के नागरिकांचा दुसरा डाेस देण्यात आला, अशी माहिती तहसीलदार वरुणकुमार सहारे यांनी दिली.
पारशिवनी तालुक्यातील काेराेना संक्रमण, ते राेखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययाेजना, काेराेना प्रतिबंधक लसीकरण, रुग्णसंख्या व मृत्युदर यासह अन्य बाबींचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार वरुणकुमार सहारे व पारशिवनी पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी अशाेक खाडे यांनी गाेंडेगाव जिल्हा परिषद सर्कलमधील गाेंडेगाव, वराडा, केरडी यासह एकूण १५ गावांचा दाैरा करीत स्थानिक लाेकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, नागरिक व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
पारशिवनी तालुक्याची एकूण लाेकसंख्या १ लाख ४१ हजार ५६ असून, यात ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या ही ४२ हजार ३१७ एवढी आहे. बुधवारपर्यंत यातील २३ हजार २३९ नागरिकांना (५४.९२ टक्के) काेराेना प्रतिबंधक लसीचा पहिला, तर १९ हजार ७८ नागरिकांना (२२.५२ टक्के) नागरिकांना दुसरा डाेस देण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार वरुणकुमार सहारे यांनी दिली.
लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने गाेंडेगाव जिल्हा परिषद सर्कलमधील गाेंडेगाव, केरडी, वराडा यासह अन्य गावांमध्ये जनजागृतीही करण्यात आली. या माहिमेत वरुणकुमार सहारे, अशाेक खाडे, जिल्हा परिषद सदस्य व्यंकट कारेमोरे यांच्यासह केरडीच्या सरपंच रत्नमाला वानखेडे, वराडाच्या सरपंच विद्या चिखले, गोंडेगावचे सरपंच नीलेश राऊत, ग्रामपंचायत सदस्य, प्रवीण शेलारे, धर्मेंद्र गणवीर यांच्यासह नागरिक व स्थानिक कर्मचारी सहभागी झाले हाेते.
....
कमी लसीकरणाची गावे
पारशिवनी तालुक्यातील सुवरधरा, कोलीतमारा, सावळी, भागेमहारी, नयाकुंड, गवना (गरांडा), वराडा, टेकाडी (काेळसा खाण), गोंडेगाव, बोरी (सिंगारदीप) या गावांमध्ये काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग फारच कमी असल्याचे आढळून आले आहे. दुसरीकडे तालुक्यातील पालासावळी, केरडी, कांद्री, हिंगणा (बाराभाई), वाघोडा, दहेगाव (जोशी), पालोरा या गावांमध्ये काेराेना संक्रमित रुग्णांची संख्या अधिक असल्याने तहसीलदार वरुणकुमार सहारे व खंडविकास अधिकारी अशाेक खाडे यांनी याही गावांचा दाैरा केला.