कुहीमध्ये ६२६ जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:07 AM2021-05-17T04:07:20+5:302021-05-17T04:07:20+5:30
कुही : तालुक्यातील विविध केंद्रांवर शनिवारी (दि. १५) ६२६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. सिल्ली-तितूरच्या जिल्हा परिषद सदस्य प्रमिला दंडारे ...
कुही : तालुक्यातील विविध केंद्रांवर शनिवारी (दि. १५) ६२६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. सिल्ली-तितूरच्या जिल्हा परिषद सदस्य प्रमिला दंडारे यांच्यासह नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण करवून घेतले. यात कुही ग्रामीण रुग्णालय येथे ९५ जणांनी लस टाेचून घेतली. तसेच मांढळ येथे ६५, वेलतूर ३६, साळवा २३, तितूर ६६, अजनी पिपरी ६३, वडेगाव-मांढळ ४३, तारणा ८७, लाेहारा ३८, अंबाडी ११० अशी एकूण ६२६ नागरिकांना लस देण्यात आली. यामध्ये प्रथम डाेस ३६६, तर २६० जणांना लसीचा दुसरा डाेस दिला गेला. तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. संजय निकम, खंडविकास अधिकारी मनाेज हिरुडकर यांंच्या मार्गदर्शनात प्राथमिक आराेग्य केंद्रातील डाॅक्टर, आराेग्यसेवक, परिचारिका, आशा वर्कर व आराेग्य कर्मचारी लसीकरणासाठी प्रयत्नरत आहेत.