१८ वर्षांवरील सर्वांना लस; १७ लाख डोसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 08:40 PM2021-04-28T20:40:41+5:302021-04-28T20:43:05+5:30

Vaccination for over 18 years मागणीनुसार पुरवठा होत नसतानाच केंद्राने १८ वर्षांवरील व्यक्तींना कोविड-१९ लससाठी रजिस्ट्रेशन सुरू केले आहे. रजिस्ट्रेशननंतरच १ मेपासून लससाठी पात्र ठरणार आहेत.

Vaccination for all over 18 years; Demand for 17 lakh doses | १८ वर्षांवरील सर्वांना लस; १७ लाख डोसची मागणी

१८ वर्षांवरील सर्वांना लस; १७ लाख डोसची मागणी

Next
ठळक मुद्देउपलब्ध होणाऱ्या लसीनुसार नियोजन : पुरवठा नसल्याने ४५ वर्षांवरील लसीकरणही अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागणीनुसार पुरवठा होत नसतानाच केंद्राने १८ वर्षांवरील व्यक्तींना कोविड-१९ लससाठी रजिस्ट्रेशन सुरू केले आहे. रजिस्ट्रेशननंतरच १ मेपासून लससाठी पात्र ठरणार आहेत. परंतु बुधवारी सकाळी २० हजार कुपी उपलब्ध होत्या. रात्रीपर्यंत लस उपलब्ध झाली नव्हती. एक दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध असल्याने सुरू असलेले ४५ वर्षांवरील लसीकरणही अडचणीत आले आहे. तिसऱ्या टप्प्यात नागपूर शहरातील १८ वर्षांवरील १२ लाख लोकांना लस दिली जाईल. यासासाठी १७ लाख डोसची मागणी केंद्राकडे नोंदविली आहे. शासनाकडून उपलब्ध होणारा साठा व शासन निर्देशानुसार लसीकरणाचे पुढील नियोजन ठरणार असल्याची माहिती मनपातील अधिकाऱ्यांनी दिली.

नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास आहे. यात ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या सुमारे आठ लाखांच्या आसपास आहे. बुधवारपर्यंत चार लाख १३ हजार ९६९ लोकांना लसीचा पहिला डोस दिला आहे, तर दुसरा डोस ७९ हजार ८३३ लोकांनी घेतला आहे. परंतु मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने ४५ वर्षांवरील लसीकरणाची गती मागील काही दिवसात मंदावली आहे.

२४ लाख डोसची गरज

१८ वर्षांवरील १२ लाख लाख लोकांना लस दिली जाणार आहे. नागपूर शहरात या वयोगटातील लोकांची संख्या १९ लाख ७८७ इतकी आहे. यातील चार लाख १३ हजार ९६९ लोकांना पहिला डोस दिला आहे. लोकांना लस देण्याचे टार्गेट १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावयाचे झाल्यास २४ लाख डोसची गरज भासणार आहे.

१.५७ लाख ज्येष्ठांचे लसीकरण

नागपूर शहरात ६० वर्षांवरील नागरिकांची संख्या अडीच लाखांहून अधिक आहे. परंतु आजवर एक लाख ५७ हजार ३१४ ज्येष्ठांनी लसीकरण केले आहे. लसीकरणाला ज्येष्ठांचाही अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे.

७९,८३३ जणांनी घेतला दुसरा डोस

पहिला डोस घेतल्यानंतर चार ते सहा आठवड्यांनी दुसरा डोस दिला जातो. आजपर्यंत ७९ हजार ८३३ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. पुढील काही दिवसात ही संख्या वाढणार आहे.

शहराची लोकसंख्या - ३० लाख

१८ वर्षांवरील लोकसंख्या -१९ लाख ७८७

स्त्री-९,२०,७१२

पुरुष-९,७९,९९५

३०२ केंद्रांची तयारी

नागपूर शहरात सध्या १२२ लसीकरण केंद्र सुरू आहे. दररोज २४ ते २५ हजार डोस देण्याची क्षमता आहे. १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी मनपा प्रशासनाने तयारी केली आहे. प्रत्येक प्रभागात दोन असे ३०२ केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. परंतु लस पुरवठा कसा होतो. यावर पुढील नियोजन करावे लागणार आहे.

डॉ. संजय चिलकर, आरोग्य अधिकारी मनपा

नागपूर शहरातील लसीकरण (२७ एप्रिलपर्यंत)

पहिला डोस

आरोग्यसेवक - ४२,७०३

फ्रंटलाइन वर्कर - ४४,३६०

४५ वर्षांवरील - ९५,६४१

४५ वर्षांवरील आजारी - ७३,९५१

६० वर्षांवरील - १,५७,३१४

एकूण - ४,१३,९६९

दुसरा डोस

आरोग्यसेवक - १९,२२२

फ्रंटलाइन वर्कर - ११,७०३

४५ वर्षांवरील - ७६४५

४५ वर्षांवरील आजारी - ७६५८

६० वर्षांवरील -३३,६०५

दुसरा डोस एकूण-७९,८३३

एकूण लसीकरण - ४,९३,८०२

Web Title: Vaccination for all over 18 years; Demand for 17 lakh doses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.