आजपासून ४५ वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:07 AM2021-04-01T04:07:42+5:302021-04-01T04:07:42+5:30

नागपूर : सातत्याने वाढणारे रुग्ण व मोठ्या संख्येने दगावणारे रुग्ण यामुळे नागपूर सध्या देशात कोरोनाच्या केंद्रस्थानी आहे. अशा परिस्थितीत ...

Vaccination for all over 45 years from today () | आजपासून ४५ वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण ()

आजपासून ४५ वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण ()

Next

नागपूर : सातत्याने वाढणारे रुग्ण व मोठ्या संख्येने दगावणारे रुग्ण यामुळे नागपूर सध्या देशात कोरोनाच्या केंद्रस्थानी आहे. अशा परिस्थितीत लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय असून जिल्ह्यात गुरुवार, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण होणार आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने कोरोना प्रतिबंधासोबतच लसीकरण मोहिमेकडे बारकाईने लक्ष वेधावे, असे आवाहन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बुधवारी सकाळी इंदिरा गांधी हॉस्पिटल, काटोल रोड परिसरातील के.टी. हॉस्पिटल, बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र, इमामवाडा आयसोलेशन केंद्र आणि उमरेड तालुक्यातील पाचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. या भेटीदरम्यान विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर आदी उपस्थित होते.

लस घेतलेल्यांनी करावा प्रचार

- ज्यांनी लस घेतली त्यांनी लसीकरणाचे ब्रॅन्ड ॲम्बेसडर होत प्रत्येक गावामध्ये ही लस सुरक्षित असल्याचा प्रचार करावा.

- ज्यांनी ही लस घेतली नाही त्यांनीही लस घेण्यासाठी आग्रह करावा.

- नागपूर जिल्ह्यात लसीकरणानंतर कोणत्याही ठिकाणी अनुचित घटनेची तक्रार नाही.

- लसीकरणामुळे कुणालाही कुठला आजार झाला अथवा कुणाची प्रकृती बिघडल्याचेदेखील पुढे आले नाही.

साडेतीन लाखावर नागरिकांनी घेतली लस

- नागपूर जिल्ह्यामध्ये लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे, अशी सर्व लोकप्रतिनिधींची मागणी आहे. यासंदर्भात केंद्राकडे पाठपुरावा केला जात आहे. ३० मार्च रोजी ९९७२ लोकांनी लस घेतली आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये ३ लाख ५९ हजार ९४३ लोकांनी लस घेतली आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे या शहरानंतर सर्वात प्रभावीपणे नागपूर जिल्ह्यामध्ये लसीकरण होत आहे.

Web Title: Vaccination for all over 45 years from today ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.