लॉकडाऊनमध्येही लसीकरण धडाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:09 AM2021-03-20T04:09:21+5:302021-03-20T04:09:21+5:30

-शहरात ८७२५ तर ग्रामीणमध्ये १०७२९ लाभार्थ्यांनी घेतली लस नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यासाठी मागील पाच दिवसांपासून कडक ...

Vaccination is also in vogue in the lockdown | लॉकडाऊनमध्येही लसीकरण धडाक्यात

लॉकडाऊनमध्येही लसीकरण धडाक्यात

Next

-शहरात ८७२५ तर ग्रामीणमध्ये १०७२९ लाभार्थ्यांनी घेतली लस

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यासाठी मागील पाच दिवसांपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. असे असतानाही लसीकरण धडाक्यात सुरू आहे. शुक्रवारी शहरात ८,७२५ तर ग्रामीणमध्ये १०,७२९ अशा एकूण १९,४५४ लाभार्थ्यांनी लस घेतली.

शहरात ७४७ हेल्थ वर्कर, १०१८ फ्रंट लाईन वर्कर, ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या १५२२ लाभार्थ्यांनी तर ६० वर्षांवरील ४४६१ ज्येष्ठांनी शुक्रवारी लसीचा पहिला डोस घेतला. ९७७ लाभार्थ्यांनी दुसरा असे एकूण ८,७२५ जणांचे लसीकरण झाले. ग्रामीणमध्ये २०४ हेल्थ लाईन वर्कर , ८४६ फ्रंटलाईन वर्कर, ४५ वर्षांवरील १६७६ तर ६० वर्षांवरील ७५६२ पहिला डोस घेतला. तर ४४१ लाभार्थ्यांनी दुसरा डोस असे एकूण १०,७२९ जणांनी लस घेतली. विशेष म्हणजे, शहरात ७४ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. मनपाचे कर्मचारी घरोघरी जाऊन ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या रुग्णांची नोंदणी करीत आहेत.

Web Title: Vaccination is also in vogue in the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.