सुराबर्डी येथे लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:08 AM2021-05-06T04:08:18+5:302021-05-06T04:08:18+5:30
वाडी : सुराबर्डी ग्रामपंचायत येथे मंगळवारी (दि.४) काेविड लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी १०४ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. ...
वाडी : सुराबर्डी ग्रामपंचायत येथे मंगळवारी (दि.४) काेविड लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी १०४ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
सुराबर्डी येथील नागरिकांना व्याहाड पेठ किंवा गाेंडखैरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी जावे लागत होते. ही अडचण दूर व्हावी म्हणून सरपंच ईश्वर गणवीर, उपसरपंच मुकेश महाकाळकर, सचिव मनीष रावत, ग्रामपंचायत सदस्य यांनी वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार व खंडविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुराबर्डी येथे लसीकरण मोहीम राबविण्याची विनंती केली हाेती. नागरिकांची अडचण लक्षात घेता सुराबर्डीत लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम यशस्वी करण्याकरिता उपसरपंच मुकेश महाकाळकर, धनराज महाडुले, प्रकाश वायकर, दीपक येलेकर यांनी गावात जनजागृती केली. यावेळी ७१ वर्षीय नागरिक परसराम सिंग यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक्षा भोयर यांनी लस टोचून लसीकरणाचा प्रारंभ केला. यावेळी वैद्यकीय अधिकारी दीक्षा मेश्राम, सचिव मनीष रावत, ग्रा.पं. सदस्य सुभाष तायडे, विनोद सोनवाणे, ग्रामपंचायत लिपिक शेषराव कोहळे, संगणक ऑपरेटर दीपक राऊत, आशावर्कर रजनी इटनकर, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.