४५ वर्षांवरील नागरिकांचे आज लसीकरण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:08 AM2021-05-10T04:08:28+5:302021-05-10T04:08:28+5:30
१८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी ६ केंद्रांवर लसीकरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शासनाच्या कोट्यातून ...
१८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी ६ केंद्रांवर लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाच्या कोट्यातून लसीचा साठा प्राप्त न झाल्यामुळे शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण आज सोमवारी बंद राहणार असल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
१८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तीसाठी सोमवारी ६ केंद्र सुरू राहतील. यामध्ये कोव्हॅक्सिन लसीकरण स्व. प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र, छाप्रू सर्वोदय मंडळ हॉल राजकुमार गुप्ता समाजभवन, बजेरिया, विरंगुळा केंद्र, जयहिंद सोसायटी, डॉ. आंबेडकर हॉस्पिटल व मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी करण्यात येईल.
१८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.