४५ वर्षांवरील नागरिकांचे आज लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:09 AM2021-05-09T04:09:07+5:302021-05-09T04:09:07+5:30
१८ ते ४४ वर्षे वयोगटांसाठी आता नऊ केंद्रांवर लसीकरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ...
१८ ते ४४ वर्षे वयोगटांसाठी आता नऊ केंद्रांवर लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य शासनाचे कोट्यातून लसीचा साठा प्राप्त झाला आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांचे रविवारी शहरातील ९६ केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल. यामध्ये इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व अ.भा. आयुर्विज्ञान संस्थामध्ये कोविशिल्ड दिली जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
४५ वर्षांवरील नागरिकांना दुसऱ्या डोससाठी प्राधान्य दिले जाईल. ज्या नागरिकांचा दुसरा डोस शिल्लक आहे, त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, तसेच १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील व्यक्तींसाठी आता नऊ केंद्रे सुरू आहेत. यामध्ये कोव्हॅक्सिन लसीकरण स्व.प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र, सर्वोदय मंडळ हॉल छाप्रुनगर सेंट्रल एव्हेन्यू, राजकुमार गुप्ता समाज भवन, बजेरिया, विरंगुळा केंद्र, जयहिंद सोसायटी, एनअयटी ग्राउंडजवळ, मनीष नगर, डॉ. आंबेडकर हॉस्पिटल व मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी करण्यात येईल. त्याशिवाय पाचपावली सूतिकागृह रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर व आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा येथे कोविशिल्ड लसीकरण करण्यात येईल.
१८ ते ४४ वर्षे वयोगटांतील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाइन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे. त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.