४५ वर्षांवरील नागरिकांचे आज लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:07 AM2021-05-17T04:07:27+5:302021-05-17T04:07:27+5:30
नागपूर : राज्य शासनाचे निर्देशानुसार ४५ वर्षांवरील वयोगटांतील नागरिकांना १७ मे रोजी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा ...
नागपूर : राज्य शासनाचे निर्देशानुसार ४५ वर्षांवरील वयोगटांतील नागरिकांना १७ मे रोजी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोज दिला जाईल. राज्य शासनाने या वयोगटातील नागरिकांना दोन्ही डोज देण्यासाठी लस उपलब्ध करून दिले आहे. मनपाच्या सर्व केंद्रावर लसीकरण केल्या जाईल. आरोग्यसेवक, फ्रंटलाइन वर्कर यांनाही दुसरा डोस दिला जाणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केंद्र येथे कोव्हॅक्सिनचा फक्त दुसरा डोस उपलब्ध आहे, तसेच १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण राज्य शासनाचे निर्देशानुसार सध्या स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
केंद्र शासनाच्या नवीन निर्देशानुसार, आता कोविशिल्डचा दुसरा डोस १२ ते १६ आठवड्यांच्या मध्यात नागरिकांना द्यायचे आहे. म्हणून नागरिकांनी याची नोंद घ्यावी. ज्या नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस १२ आठवड्यांपूर्वी घेतला, त्यांना दुसरा डोस दिला जाईल, तसेच ड्राइव इन व्हॅक्सिनेशन केंद्र वर ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होईल.