४५ वर्षावरील नागरिकांचे आज लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:08 AM2021-05-19T04:08:33+5:302021-05-19T04:08:33+5:30
नागपूर : राज्य शासनाचे निर्देशानुसार ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना आज बुधवारी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला व दुसरा ...
नागपूर : राज्य शासनाचे निर्देशानुसार ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना आज बुधवारी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाईल. राज्य शासनाने या वयोगटातील नागरिकांना दोन्ही डोस देण्यासाठी लस उपलब्ध केली आहे. केंद्र शासनाच्या नवीन निर्देशानुसार आता कोव्हिशिल्डचा दुसरा डोस १२ ते १६ आठवड्यांच्या मधात नागरिकांना द्यायचा आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी. ज्या नागरिकांना कोव्हिशिल्डचा पहिला डोज १२ आठवड्यांपूर्वी घेतला त्यांना दुसरा डोस दिला जाईल. मनपाच्या सर्व केंद्रांवर लसीकरण केल्या जाईल. आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर यांनासुद्धा दुसरा डोस दिला जाणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज) व स्व. प्रभाकर दटके, महाल रोग निदान केंद्र येथे कोव्हॅक्सिनचा फक्त दुसरा डोस उपलब्ध आहे. तसेच १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण राज्य शासनाचे निर्देशानुसार सध्या स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. तसेच ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होईल.