८४ शासकीय केंद्रांवर लसीकरण सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:08 AM2021-04-08T04:08:53+5:302021-04-08T04:08:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी मनपा दवाखाने, शासकीय रुग्णालय मिळून तब्बल ८४ केंद्रांवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी मनपा दवाखाने, शासकीय रुग्णालय मिळून तब्बल ८४ केंद्रांवर नि:शुल्क लसीकरण केल्या जात आहे. या सर्व केंद्रांवर ४५ वर्षावरील नागरिकांना लस दिली जात आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण केले जाईल. काही केंद्रांमध्ये रात्री १० वाजेपर्यंतसुद्धा लस दिली जात आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाची तीव्रता कमी होते. ८ एप्रिलपासून विशेष मोहीम, विशेष वर्गाकरिता राबविली जात आहे. सोबतच सामान्य नागरिकांनासुद्धा याच केंद्रांमध्ये लस दिली जाणार आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनपाने केले आहे.
...
आज चालकांचे लसीकरण
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे निर्देशानुसार ४५ वर्षांवरील वयोगटातील ऑटोरिक्शाचालक, सायकल रिक्शाचालक, ई-रिक्शाचालक, काली-पिली टॅक्सीचालक, ओला-उबेर टॅक्सीचालक व खासगी ट्रॅव्हल्समध्ये काम करणाऱ्या नागरिकांचे ८ एप्रिलला सर्व शासकीय केंद्रांमध्ये लसीकरण केले जाईल. लसीकरणासाठी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसेंस, पासपोर्ट आदी शासकीय परिचयपत्र सोबत ठेवावे.