मकरधोकडा आरोग्य केंद्रात ‘फिरते लसीकरण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:10 AM2021-04-08T04:10:03+5:302021-04-08T04:10:03+5:30

उमरेड : तालुक्यातील मकरधोकडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने फिरत्या लसीकरणाची संकल्पना राबविण्यात येत आहे. रुग्णवाहिकेत संपूर्ण तयारीनिशी आरोग्य कर्मचाऱ्यांचा ...

'Vaccination' at Makardhokada Health Center | मकरधोकडा आरोग्य केंद्रात ‘फिरते लसीकरण’

मकरधोकडा आरोग्य केंद्रात ‘फिरते लसीकरण’

googlenewsNext

उमरेड : तालुक्यातील मकरधोकडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने फिरत्या लसीकरणाची संकल्पना राबविण्यात येत आहे. रुग्णवाहिकेत संपूर्ण तयारीनिशी आरोग्य कर्मचाऱ्यांचा चमू वेगवेगळ्या गावांमध्ये थेट पोहोचत आहे. डॉक्टरसुद्धा सोबत असल्याने लसीकरणाबाबतही माहिती दिली जात आहे. या उपक्रमासाठी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून गावकऱ्यांमध्ये लसीकरणाबाबत असलेले संभ्रमही दूर केले जात आहेत. शिवाय अफवांवर विश्वास ठेवायचा नाही, अशाही बाबी या माध्यमातून सांगितल्या जात आहेत. काही नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवितात. अशावेळी त्यांना समजावून सांगण्याचीही जबाबदारी पार पाडली जाते.

प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ही संकल्पना राबवीत असून योग्य ठिकाणीच हे लसीकरण करीत आहोत, असे मत वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली वानखेडे यांनी व्यक्त केले. डॉ. अतुल चोपडे, डॉ. तृप्ती गिल्लूरकर, डॉ. श्रुती निर्मल, गोवर्धन राऊत, संगीता देहारी, वैशाली समरीत, अनिल शंभरकर, माया रंगारी, केशव चंदनखेडे, पल्लवी जुमडे, ज्योती धनगर, अविनाश पिल्लारे, भावना काळे, पुष्पा शनिवारे, अमृत मांढरे, गुंथा गजभिये, विष्णू खंडारे, ऋषी मांढरे, आदी आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, परिचारिका, आदींनी सहकार्य केले.

८०० लसीकरण

मकरधोकडा, खुर्सापार, आमगाव, देवळी, नवेगाव साधू, ठाणा, तिरखुरा, कऱ्हांडला, भापसी, सेव, देणी, वानोडा, आमगाव देवळी, तांबेखणी, जांभळापाणी, मुरझडी, लोहारा, भिवगड, खैरी, धूरखेडा, दिघोरी, कळमना, मोहपा, कुंभारी, आदी गावांमधील ८०० नागरिकांचे लसीकरण पार पडले. या अभिनव संकल्पनेची पाहणी करीत तहसीलदार प्रमोद कदम, खंडविकास अधिकारी जयसिंग जाधव, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संदीप धरमठोक, डॉ. निशांत नाईक यांनी कौतुक केले.

---

उमरेड तालुक्यातील मकरधोकडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने फिरत्या लसीकरण मोहिमेतील अधिकारी व कर्मचारी.

Web Title: 'Vaccination' at Makardhokada Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.