ग्रामीण भागात दहा लाख लोकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:08 AM2021-07-29T04:08:14+5:302021-07-29T04:08:14+5:30
२,२२,४७९ लोकांनी घेतला दुसरा डोस लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेत ...
२,२२,४७९ लोकांनी घेतला दुसरा डोस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेत ग्रामीण भागातील जनतेने दिलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळे जिल्ह्यात १० लाख ९ हजार ३५८ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी बुधवारी दिली.
लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामीण भागात विविध विभागांच्या समन्वयातून विशेष प्रयत्न सुरू असून यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी - कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळे या मोहिमेला गती मिळाली आहे. १० लाख लसीकरणामध्ये ७ लाख ८६ हजार ८७९ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, २ लाख २२ हजार ४७९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
लसीकरणासाठी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच ग्रामपंचायत स्तरावर लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या लसीकरणामध्ये शासकीय लसीकरण केंद्रांवर ९ लाख ५४ हजार १४० नागरिकांनी, तर खासगी लसीकरण केंद्रांवर ५५ हजार २१८ नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतला आहे.
- तालुकानिहाय एकूण लसीकरण...
भिवापूर - ४०,७१७
हिंगणा - १,०९,९४७
कळमेश्वर - ६७,०९६
कामठी - १,०६,६६९
काटोल - ७६,७०१
कुही - ४५,९७६
मौदा - ५९,३५७
नागपूर ग्रामीण - १,२१,६७८
नरखेड - ६०,९७६
पारशिवनी - ६६,२०९
रामटेक - ५१,८९६
सावनेर - १,०१,१८२
उमरेड - १,००,९५४