१० दिवसात केवळ १ लाख ३७ हजार लोकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:07 AM2021-07-11T04:07:32+5:302021-07-11T04:07:32+5:30

नागपूर : कोरोनाचा संभाव्य तिसऱ्या लाटेच्या गंभीर परिणामाला दूर ठेवण्यासाठी, ‘डेल्टा प्लस’ विषाणूशी लढा देण्यासाठी, एवढेच नव्हे तर विस्कळीत ...

Vaccination of only 1 lakh 37 thousand people in 10 days | १० दिवसात केवळ १ लाख ३७ हजार लोकांचे लसीकरण

१० दिवसात केवळ १ लाख ३७ हजार लोकांचे लसीकरण

Next

नागपूर : कोरोनाचा संभाव्य तिसऱ्या लाटेच्या गंभीर परिणामाला दूर ठेवण्यासाठी, ‘डेल्टा प्लस’ विषाणूशी लढा देण्यासाठी, एवढेच नव्हे तर विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण हाच पर्याय आहे. परंतु प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे लसीकरणाच्या आकडेवारीवरून दिसून येते. मागील १० दिवसात १ लाख ३७ हजार ४३ लोकांचे लसीकरण झाले. यातही केवळ दोन दिवसच ३० हजारांपुढे तर उर्वरित आठ दिवसात पाच हजारांवरही लसीकरण झाले नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.

कोरोनाचा पहिल्या व दुसऱ्या लाटेत अपुऱ्या वैद्यकीय सोयींमुळे रुग्णसेवा प्रभावित झाली. रुग्णालयातील बेड, औषधे, ऑक्सिजन, डॉक्टर, कर्मचारी कमी पडल्याने वेळेत उपचारापासून रुग्ण दुरावल्याने त्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाने या भीषण स्थितीचा सामना केला. यातच आता राज्यात ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’ने चिंता वाढवली आहे. मात्र, ‘कधी सुरू, कधी बंद’ असेच लसीकरण सुरू आहे. यामुळे तिसरी लाट आल्यास याचा सर्वाधिक फटका सामान्यांना बसण्याची दाट शक्यता आहे.

-३ व ७ जुलै रोजीच वाढले लसीकरण

नागपूर जिल्ह्यात मागील दहा दिवसांमध्ये केवळ ३ जुलै रोजी पहिला व दुसरा डोस मिळून

३९ हजार ३९९ तर ७ जुलै रोजी ६० हजार ३७१ लसीकरणाची नोंद झाली. हे दोन दिवस वगळता १ जुलै रोजी ६१८, २ जुलै रोजी ३ हजार ४२, ४ जुलै रोजी ४ हजार ५८५, ५ जुलै रोजी ४ हजार ८१, ६ जुलै रोजी १ हजार ६४४, ८ जुलै रोजी १ हजार ९६७, १० जुलै रोजी १ हजार ७९४ तर १०जुलै रोजी १ हजार ८३० लोकांचे लसीकरण होऊ शकले.

-९.६१ टक्केच लोकांना दुसरा डोस

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत १२ लाख ६७ हजार ५४० लोकांनी पहिला डोस घेतला. तर, ४ लाख ३ हजार ८१३ लोकांनी दुसरा डोस घेतला. नागपूर जिल्ह्याचा लोकसंख्येच्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ ९.६१ टक्केच असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

तारीख: पहिला : दुसरा : एकूण डोस

१ जुलै : ४०८: २१० : ६१८

२ जुलै : २१४४ : ८९८ : ३०४२

३ जुलै : २३४६८ : १५९३१ : ३९३९९

४ जुलै : २९५६ : १६२९ : ४५८५

५ जुलै : २५९८ : १४८३:४०८१

६ जुलै : १३८४ : २६० : १६४४

७ जुलै : ३३६१३ : २६७५८ : ६०३७१

८ जुलै : ६५४६:१३१३३ : १९६७

९ जुलै : १४०७ : ३८७ : १७९४

१० जुलै : १३६० : ४७० : १८३०

Web Title: Vaccination of only 1 lakh 37 thousand people in 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.