कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:09 AM2021-05-11T04:09:33+5:302021-05-11T04:09:33+5:30
नरखेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे नरखेड तालुक्यातील प्रत्येकाने लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन ...
नरखेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे नरखेड तालुक्यातील प्रत्येकाने लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन लोकप्रतिनिधींच्या वतीने करण्यात आले. तालुक्यातील कोरोना परिस्थिती व लसीकरण मोहीम यावर स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची पंचायत समितीच्या कार्यालयात बैठक झाली. या आढावा बैठकीत खा. कृपाल तुमाने, सभापती नीलिमा सतीश रेवतकर, वैभव दळवी, तहसीलदार डी.जी. जाधव, खंडविकास अधिकारी प्रशांत मोहोड, पोलीस निरीक्षक जयपालसिंग गिरासे, तालुका आरोग्य अधिकारी विद्यानंद गायकवाड, नरखेड न.प.चे मुख्याधिकारी प्रवीण मानकर, मोवाड न.प.च्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी तालुक्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत तहसीलदार यांनी माहिती सादर केली. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. नरखेड ग्रामीण रुग्णालय येथील ऑक्सिजन पुरवठा लाईनचे काम तातडीने पूर्णत्वास नेण्यावर बैठकीत चर्चा झाली. बैठकीला राजू हरणे, हिंमत नखाते, ललित खंडेलवाल, हिराचंद कडू, हंसराज गिरडकर, मुन्ना राय, संजय बारमासे, रमेश रेवतकर, संजय बारमासे, वासू ठाकरे, विक्की काळबांडे, चंद्रकांत जिचकर यांनीही तालुक्यात परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.