सलग चौथ्या दिवशी लसीकरण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:07 AM2021-07-02T04:07:40+5:302021-07-02T04:07:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरात १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात झाल्याने तरुणांत उत्साह होता. मात्र मागणीनुसार पुरवठा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात झाल्याने तरुणांत उत्साह होता. मात्र मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने लागोपाठ चौथ्या दिवशी शुक्रवारी लसीकरण केंद्र बंद राहणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांची डोससाठी भटकंती सुरू आहे.
पुरेशा प्रमाणात डोसचा पुरवठा होत नसल्याने मागील आठ दिवसांत पाच दिवस शहरातील लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले. २३ जूनला १८ वर्षांवरील लसीकरणाला सुरुवात झाली; परंतु डोस उपलब्ध नसल्याने २५ जून, २७ जून, २९ व ३० जून व १ जुलैला लसीकरण झाले नाही. त्यात गुरुवारी सायंकाळपर्यंत महापालिकेला डोस उपलब्ध झाले नाहीत; यामुळे शुक्रवारी शहरातील महापालिकेचे लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली; परंतु तीन केंद्रांवर कोव्हॅक्सिन दिली जाणार आहे. यात मेडिकल कॉलेज, स्व. प्रभाकरराव दटके रोगनिदान केंद्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचा समावेश आहे. कोव्हॅक्सिनसाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे.
...
नागपुरात लसीकरणाची अद्ययावत स्थिती (३० जून)
पहिला डोस
आरोग्यसेवक - ४६३२५
फ्रंटलाईन वर्कर - ५३,२९८
१८ वयोगट - १,४९,८७४
४५ वयोगट -१५१०५०
४५ कोमार्बिड - ८६,११६
६० सर्व नागरिक - १,८४०७५
पहिला डोस - एकूण - ६,७०७३८
दुसरा डोस
आरोग्यसेवक - २५४२०
फ्रंटलाईन वर्कर - २७७५४
१८ वयोगट - ७९३४
४५ वयोगट - ४६४३९
४५ कोमार्बिड - २१,६५९
६० सर्व नागरिक -८९,५१८
दुसरा डोस - एकूण - २,१३७२४
संपूर्ण लसीकरण एकूण - ८,८४,४६२
....