सलग तिसऱ्या दिवशी उत्साहात लसीकरण ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:07 AM2021-06-22T04:07:24+5:302021-06-22T04:07:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपुरात शनिवारपासून ३० ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात ...

Vaccination for the third day in a row () | सलग तिसऱ्या दिवशी उत्साहात लसीकरण ()

सलग तिसऱ्या दिवशी उत्साहात लसीकरण ()

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपुरात शनिवारपासून ३० ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ऑनलाइन नोंदणी आवश्यक असलेल्या या लसीकरणाला सलग तिसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. सोमवारी शहरातील १०५ केंद्रांवर ११ हजार २३१ नागरिकांनी लसीकरण करून घेतले. यात खासगी रुग्णालयात २९४, तर शासकीय केंद्रावर १० हजार ९३७ नागरिकांनी लस घेतली.

शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेने लसीकरणासाठी आधीच नियोजन केले होते. त्यानुसार शहरातील एकूण १०५ केंद्रांवरून लसीकरण करण्यात येत आहे. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेण्यासाठी संबंधित वयोगटासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक आहे. त्यानुसार कोविन अ‍ॅपवर ऑनलाइन नोंदणी करणारांनाच लस दिली जात आहे. शहरातील केंद्रांना गरजेनुसार २००, तर काहींना १०० डोस उपलब्ध केले जात आहेत. प्रत्येक जण दिलेल्या स्लॉटमध्ये जाऊन लसीकरण करून घेत असल्याने केंद्रावर होत नाही. नागरिक कोरोनासंबंधित नियमांचे पालन करून लसीकरण करून घेत आहेत.

....

४५ वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण

शुक्रवारपर्यंत शहरातील बहुतांश सर्वच केंद्रांवर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होते. ३० ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय झाल्यानंतर सर्व १०५ केंद्रांवरून ३० ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसोबतच ४५ वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण केले जात आहे. सोबतच ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन’अंतर्गतसुद्धा ३० ते ४४ आणि ४५ वर्षांवरील अशा दोन्ही वयोगटांतील नागरिकांना लस दिली जात आहे.

...

१८ वर्षांवरील नागरिकांना तूर्त प्रतीक्षा

केंद्र सरकारने २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्या प्रमाणात लस उपलब्ध नसल्याने ३० वर्षांवरील नागरिकांनाच लस दिली जात आहे. शासकीय केंद्रावर लस मोफत दिली जात आहे, तर खासगी केंद्रावर यासाठी शुल्क आकारले जात आहे.

...

खासगी रुग्णालयात लसीचे असे आहेत दर

कोव्हॅक्सिन -१४१०

कोविशिल्ड -७९०

स्पुतनिक -११४५

......

तीन केंद्रांवर कोव्हॅक्सिन

४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा मेडिकल कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व महाल येथील स्व. प्रभाकर दटके रोगनिदान केंद्र येथे उपलब्ध आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणीचा पर्याय उपलब्ध आहे.

....

नागपुरात लसीकरणाची अद्ययावत स्थिती (२० जून)

पहिला डोस

आरोग्यसेवक - ४६०७४

फ्रंटलाइन वर्कर - ५३२५६

१८ वयोगट - ३५५२४

३० ते ४४ वयोगट - १६६९५

४५ वयोगट - १४३३७३

४५ कोमार्बिड - ८४९९०

६० सर्व नागरिक - १८११८३

पहिला डोस - एकूण - ५६१०९५

दुसरा डोस

आरोग्यसेवक - २४५४४

फ्रंटलाइन वर्कर - २१२५३

१८ वयोगट - ७२४३

४५ वयोगट - ३३९८९

४५ कोमार्बिड - २००८६

६० सर्व नागरिक - ८१७८३

दुसरा डोस - एकूण - १८८८९८

संपूर्ण लसीकरण एकूण - ७४९९९३

...........

Web Title: Vaccination for the third day in a row ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.