चार दिवसांच्या ब्रेकनंतर आज हाेणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:07 AM2021-07-03T04:07:27+5:302021-07-03T04:07:27+5:30
नागपूर : शहरात लसीअभावी लसीकरणाची माेहीम चार दिवस बंद राहिल्यानंतर शनिवारी १४० केंद्रांवर लसीकरण हाेणार आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत महापालिकेकडे ...
नागपूर : शहरात लसीअभावी लसीकरणाची माेहीम चार दिवस बंद राहिल्यानंतर शनिवारी १४० केंद्रांवर लसीकरण हाेणार आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत महापालिकेकडे केवळ २४ हजार डाेस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे पुढे डाेस मिळाले तरच लसीकरण सुरू राहील, नाहीतर पुन्हा लसीकरण थांबण्याची शक्यता आहे.
नागपुरात १८ पेक्षा अधिक वयाेगटाचे लसीकरण २३ जूनपासून सुरू झाले. मात्र या १० दिवसांत ६ दिवस लसीकरण बंदच हाेते. मागील चार दिवसांपासून हीच परिस्थिती आहे. शहरात २५ जून, २७ जून, २९ जून, ३० जून आणि १ व २ जुलै राेजी लसीकरण हाेऊ शकले नाही.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जाेशी यांनी सांगितले, लस उपलब्ध हाेताच शहरात शनिवारी लसीकरण घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १४० केेंद्रांवर काेविशिल्ड लस देण्यात येईल. सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत ऑनलाइन व ऑफलाइन नाेंदणीद्वारे हे लसीकरण हाेईल. याशिवाय तीन केंद्रांवर काेव्हॅक्सिनची लस देण्यात येईल. काेविशिल्डचा दुसरा डाेस १२ आठवड्यांनंतर दिला जाऊ शकताे.
लस आणण्याकडे दुर्लक्ष
चार दिवसांच्या ब्रेकनंतर नागपूर जिल्ह्यासाठी ४० हजार डाेस उपलब्ध झाले. यापैकी २४ हजार शहरासाठी व १६ हजार ग्रामीणसाठी देण्यात येतील. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार मुंबई व पुण्याच्या तुलनेत नागपूरला अतिशय कमी प्रमाणात लस उपलब्ध केली जात आहे. यामुळेच शहरात लसीकरणाचा खाेळंबा हाेत आहे. आवश्यक प्रमाणात डाेस उपलब्ध झाले तर केंद्रे वाढवून वेगाने लसीकरण केले जाऊ शकते.