लसीचे दुष्परिणाम नाहीत, सकारात्मकतेने लस घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:09 AM2021-04-08T04:09:17+5:302021-04-08T04:09:17+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : काेराेनाबाधितांची वाढती संख्या पाहता शासनाने लसीकरणाला गती दिली आहे; परंतु ग्रामीण भागात काेविड लस ...

The vaccine has no side effects, take the vaccine positively | लसीचे दुष्परिणाम नाहीत, सकारात्मकतेने लस घ्या

लसीचे दुष्परिणाम नाहीत, सकारात्मकतेने लस घ्या

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : काेराेनाबाधितांची वाढती संख्या पाहता शासनाने लसीकरणाला गती दिली आहे; परंतु ग्रामीण भागात काेविड लस घेण्याबाबत गैरसमज निर्माण झाल्याने बहुतांश नागरिक लस घेण्यास धजावत नाहीत. ही लस मानवी आराेग्यास घातक नसून ती राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास पूरक ठरते. तेव्हा नागरिकांनी सकारात्मकतेने लस घ्यावी, असे आवाहन सरपंच व ग्रामविकास अधिकारी करीत असून, गावागावांत लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे.

गेल्या पंधरवड्यात आकाेली गावात काेराेना रुग्णसंख्येत वाढ झाली. एकाच घरातील तीन-चार रुग्ण पाॅझिटिव्ह येऊ लागले. अशात ज्येष्ठांना लस देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. लस घेतल्यानंतर काहीजण तापाने फणफणले. त्यामुळे गावात लसीबाबत गैरसमज निर्माण झाले. वास्तविक लस घेतल्यामुळे मानवी आराेग्यावर दुष्परिणाम हाेत नाही. कुठलीही भीती न बाळगता नागरिकांनी लस टाेचून घ्यावी, अशी माहिती डाॅक्टरांनी दिली.

कुही तालुक्याची एकूण लाेकसंख्या ११७५६७ असून, ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या २९३९२ इतकी आहे. यात ४५ वर्षांवरील १४,०२२ नागरिकांचे आतापर्यंत लसीकरण झाले. अर्थात ४७.७१ टक्के लसीकरण झाले असून अजूनही १५,३७० नागरिकांचे लसीकरण शिल्लक आहे. दरराेज ५,००० लस दिली गेल्यास १०० टक्के लसीकरण पूर्ण हाेईल. यासाठी गावागावांत जनजागृती केली जात असून, नागरिकांनी लस टाेचून घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. सद्य:स्थितीत कुही तालुक्यात दरराेज रुग्ण पाॅझिटिव्ह येत आहे. मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. काेराेनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हा एकमात्र उपाय असून, नागरिकांनी लसीकरण करवून घ्यावे, असे आवाहन तालुका उपविभागीय अधिकारी हर्षा पाटील, तहसीलदार बाबाराव तिनघसे, खंडविकास अधिकारी मनोज हिरुडकर, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय निकम यांनी केले आहे.

Web Title: The vaccine has no side effects, take the vaccine positively

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.