सर्वसामान्य नागरिकांसाठी मार्चपर्यंत व्हॅक्सिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:09 AM2021-01-16T04:09:37+5:302021-01-16T04:09:37+5:30
मेहा शर्मा नागपूर : आरोग्य कर्मचाऱ्यांना १६ जानेवारीपासून कोरोना व्हॅक्सिन लावण्यात येणार आहे. तर सर्वसामान्य नागिरकांना मार्चपर्यंत ही व्हॅक्सिन ...
मेहा शर्मा
नागपूर : आरोग्य कर्मचाऱ्यांना १६ जानेवारीपासून कोरोना व्हॅक्सिन लावण्यात येणार आहे. तर सर्वसामान्य नागिरकांना मार्चपर्यंत ही व्हॅक्सिन उपलब्ध होईल, असा विश्वास शहरातील डॉक्टरांनी लोकमतशी चर्चा करताना व्यक्त केला आहे.
डॉ. राजू खंडेलवाल यांनी सांगितले की, एक महिन्यानंतरच ही व्हॅक्सिन सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होईल. सध्या बाजारात व्हॅक्सिन येऊ नये. याऐवजी शासकीय यंत्रणेद्वारे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. बाजारात व्हॅक्सिन आली तर ती महाग होऊ शकते. अशा वेळी गरिबांपर्यंत ती पोहोचणे कठीण होईल. तसेच एकदा स्वदेशी व्हॅक्सिन बाजारात आली तर विदेशी व्हॅक्सिनसुद्धा येईल. त्यामुळे भारतीय उत्पादनावरही त्याचा परिणाम पडू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
डॉ. पिनाक दंदे यांनी सांगितले की, दुसरा डोज संपला की एक महिन्यानंतर सामान्य नागरिकांसाठीसुद्धा व्हॅक्सिन उपलब्ध होईल. जे लोक व्हॅक्सिन खरेदी करू शकत नााही, त्यांच्यासाठी सरकार शून्य दरावर उपलब्ध करून देण्याची योजना तयार करीत आहे.
डॉ. जसपाल अर्नेजा यांनी सांगितले की, मार्चपर्यंत व्हॅक्सिन येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी ती शासकीय रुग्णालयांमध्येच उपलब्ध राहील. मला मिळालेल्या माहितीनुसार व्हॅक्सिन सुरक्षित आहे. प्रत्येकाने ती लावायला हवी. कुठलेही साईड इफेक्ट कमी किंवा फार कमी होऊ शकतात. परंतु व्हॅक्सिन पूर्णपणे सुरक्षित आहे.
शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले की, व्हॅक्सिन सर्वसामान्य नागरिकांसाठी कधी उपलब्ध होईल, हे सांगणे कठीण आहे. आवश्यकतेवर ते अवलंबून आहे.
डॉ. अशोक अर्बट यांनी सांगितले की, अगोदर हे पाहावे लागेल की, पहिल्या तीन कोटी लोकांपर्यंत ती पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल.