रक्तदान करून वडिलांना वाहिली श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:01+5:302021-07-16T04:08:01+5:30

- देवा उसरे स्मृतिप्रीत्यर्थ गड्डीगोदाम येथे रक्तदान शिबिर : १११ दात्यांनी केले रक्तदान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काँग्रेसचे ...

Vahili paid homage to her father by donating blood | रक्तदान करून वडिलांना वाहिली श्रद्धांजली

रक्तदान करून वडिलांना वाहिली श्रद्धांजली

Next

- देवा उसरे स्मृतिप्रीत्यर्थ गड्डीगोदाम येथे रक्तदान शिबिर : १११ दात्यांनी केले रक्तदान

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांच्या जयंतीच्या पर्वावर त्यांच्या स्मृतीला अभिवादन करत अभिषेक देवा उसरे यांच्या पुढाकाराने गड्डीगोदाम येथे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदानाचे शतक पूर्ण केले.

‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यस्तरीय रक्तसंकलन अभियानात पुढाकार घेत अभिषेक उसरे यांनी आपल्या वडिलांच्या जयंतीनिमित्त गड्डीगोदाम येथील वायएमसीए, मोहननगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन आ. विकास ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. सर्वप्रथम स्व. देवा उसरे व स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या शिबिरात १११ दात्यांनी रक्तदान करत राष्ट्रीय कर्तव्यात सहभाग दिला. रक्तदान शिबिरासाठी कार्यकर्त्यांमध्ये सकाळपासूनच उत्साह दिसून येत होता. रक्तदात्यांचे स्वागत करण्यात येत हाेते. ब्लड बँकेचे पथक यासाठी सज्ज होते. शिबिराचे समन्वयक राकेश शाहू, सय्यद जफर, सचिन कलनाके, विशाल दोरसटवार, कबीर मातरवार, मुन्ना खान, राजेश टेकदूलवार, हाजी सलिम कुरेशी, अनिता सावळे, इक्बाल कुरेशी, अश्फाक कुरेशी, शफी कुरेशी, सेलर डिसूजा, रेनिटा क्लार्क, भूषण कोटपल्लीवार, गणेश कासल्या, वरूण रेड्डी, जावेद खान, यासीर अराफात कुरेशी, शेख मुजम्मील कुरेशी, सोहेल कुरेशी, राकेश एन्थोनी यांनी परिश्रम घेतले.

.....................

Web Title: Vahili paid homage to her father by donating blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.