‘व्हॅलेन्टाईन वीक’; चाॅकलेट डे; तरुणाईची खरेदीसाठी उडाली झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 07:00 AM2022-02-09T07:00:00+5:302022-02-09T07:00:08+5:30
Nagpur News नागपुरात चाॅकलेट दिनासह प्रेम दिनाचाही उत्साह बाजारात आहे. हा प्रसंग साधून तरुण-तरुणी आपल्या प्रियजनांसाठी चाॅकलेट खरेदीसाठी पाेहोचत आहेत.
नागपूर : व्हॅलेन्टाईन डे घेऊन येणारा फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना. प्रत्यक्ष व्हॅलेन्टाईन डे ला धरून ७ तारखेपासून सुरू हाेणारा व्हॅलेन्टाईन वीक म्हणजे प्रेम सप्ताह आणि सप्ताहाचा एक विशेष दिन म्हणजे चाॅकलेट डे. आवडणाऱ्या व्यक्तीला चाॅकलेट देऊन प्रेमाचा अप्रत्यक्ष इजहार करण्याचाच हा प्रसंग. तसे चाॅकलेट प्रेमीयुगलांनाच नाही, तर प्रत्येकाच्या आवडीचे. त्यामुळे मित्रांमध्येही चाॅकलेटचे आदानप्रदान हमखास हाेतेच. त्यामुळे नागपुरातही चाॅकलेट दिनासह प्रेम दिनाचाही उत्साह बाजारात आहे. हा प्रसंग साधून तरुण-तरुणी आपल्या प्रियजनांसाठी चाॅकलेट खरेदीसाठी पाेहोचत आहेत.
हाेम मेड चाॅकलेटला पसंती
व्हॅलेन्टाईन डेच्या खरेदीसाठी बाजारात पाेहोचलेल्या तरुण-तरुणींशी लाेकमतने चर्चा केली. प्रेमाची अप्रत्यक्ष कबुली द्यायला चाॅकलेट हे बेस्ट ऑप्शन आहे, पण या चाॅकलेटमध्येही पर्याय आहेत. बहुतेकांना हाेम मेड चाॅकलेट देणे-घेणे जास्त भावत असल्याचे दिसले. कारण त्यांना मनाप्रमाणे सजावट करणे साेपे असते. दरम्यान, आराेग्याबाबतही सजगता दिसून आली. हाेममेड चाॅकलेटची ऑर्डर देताना साखरेच्या प्रमाणाबाबत संतुलन ठेवणे साेपे जात असल्याचे तरुणींचे म्हणणे हाेते.
हृदयाच्या आकाराच्या चाॅकलेटची मागणी
हाे, प्रेमाचा काळ असल्याने ‘दिल की बात’ अधिक महत्त्वाची असते. मग चाॅकलेटही ‘हार्ट शेप’ का नाही. चाॅकलेट-केक विक्रेता रूचा यांनी या हृदयी चाॅकलेटची मागणी अधिक असण्याला दुजाेरा दिला. आता मागणी तसा पुरवठा हाेणारच. त्यामुळे लहान-माेठ्या आकारात हार्ट शेप चाॅकलेट तयार करण्यावर अधिक भर. व्हॅलेन्टाईन सप्ताहामध्ये चाॅकलेटची विक्री अधिक हाेते व कालपासूनच चाॅकलेट खरेदी वाढल्याचे त्यांनी सांगितले, पण हार्ट शेप चाॅकलेट ‘ऑन डिमांड’ आहेत.
आता चाॅकलेटच्या किमतीही पाहून घ्या
हाेम मेड चाॅकलेट - ६० रुपये
राेमांटिक डार्क चाॅकलेट - १२० रु.
चाॅकलेट बंच - २४० रु.
हाेम मेड लहान सिंगल पीस - २० रु.
व्हॅलेन्टाईन बॅग - ४०० रु.
चाॅकलेट बाॅक्स - ५० ते २५० रु.