नागपुरात  १००९ विद्यार्थ्यांना व्हॅलिडीटीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:19 AM2018-06-17T01:19:24+5:302018-06-17T01:19:35+5:30

बारावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय व व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असेल, अशा विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षण संचालनालयाने व्हॅलिडीटी प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात गेल्या चार-पाच दिवसांपासून विद्यार्थी व पालकांची चांगलीच गर्दी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कार्यालयाने सुटीच्या दिवशीही विशेष शिबिर घेऊन १००९ जात पडताळणी प्रमाणपत्र वाटप केले.

Validity allocation to 1009 students in Nagpur | नागपुरात  १००९ विद्यार्थ्यांना व्हॅलिडीटीचे वाटप

नागपुरात  १००९ विद्यार्थ्यांना व्हॅलिडीटीचे वाटप

Next
ठळक मुद्देजिल्हा जात पडताळणी समितीने घेतले विशेष शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बारावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय व व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असेल, अशा विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षण संचालनालयाने व्हॅलिडीटी प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात गेल्या चार-पाच दिवसांपासून विद्यार्थी व पालकांची चांगलीच गर्दी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कार्यालयाने सुटीच्या दिवशीही विशेष शिबिर घेऊन १००९ जात पडताळणी प्रमाणपत्र वाटप केले.
यापूर्वीही समितीतर्फे ८०० प्रमाणपत्राचे वाटप शिबिर घेऊन करण्यात आले होते. सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची चांगलीच धावपळ उडाली आहे. नागपूर जिल्हा जात पडताळणी समितीचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. शनिवारी राबविलेल्या शिबिरामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले. अजूनही त्रुटीच्या ५०० च्या जवळपास प्रकरण पेंडींग आहे. त्यामुळे रविवारी विद्यार्थ्यांना त्रुटीची पूर्तता करण्याची संधी आहे. शनिवारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब धुळाज व उपायुक्त तसेच सदस्य आर.डी. आत्राम यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या शिबिरामुळे विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Validity allocation to 1009 students in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.