वनभवनातील तीन कर्मचाऱ्याचे अहवाल ‘निगेटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:28 AM2020-07-19T00:28:31+5:302020-07-19T00:29:58+5:30
वनभवनातील एका कर्मचाºयाचा १३ जुलैला कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर अलीकडे पुन्हा एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला. यामुळे वनभवनातील अधिकारी आणि कर्मचारी दहशतीमध्ये आहेत. दरम्यान, शुक्रवारी तीन कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी नेले होते. ते निगेटिव्ह आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वनभवनातील एका कर्मचाºयाचा १३ जुलैला कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर अलीकडे पुन्हा एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला. यामुळे वनभवनातील अधिकारी आणि कर्मचारी दहशतीमध्ये आहेत. दरम्यान, शुक्रवारी तीन कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी नेले होते. ते निगेटिव्ह आले आहेत.
वनभवनातील पब्लिसिटी विभागातील ४५ वर्षीय कर्मचाऱ्याचा १३ जुलैला कोरोनामुळे मृत्यू झाला होता. वनभवनाने दिलेल्या माहितीनुसार, हा कर्मचारी ३० जूनला व नंतर ८ जुलैला कार्यालयात आला होता. दरम्यानच्या काळात त्याची ड्यूटी जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आली होती. याच कार्यालयातील बजेट विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने उपचारासाठी दाखल केले होते. त्याची तपासणी केली असता तोसुद्धा पॉझिटिव्ह निघाला. विशेष म्हणजे हा कर्मचारी मृत पावलेल्या कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाणे व आणण्यासाठी सहकार्य करीत होता. या कर्मचाऱ्याचे पब्लिसिटी विभागात नेहमी येणे-जाणे असे. त्यामुळे त्याच्या संपर्कातील तीन कर्मचाऱ्यांचे नमुने शुक्रवारी घेण्यात आले. शनिवारी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या घटनेनंतर कार्यालय सॅनिटाइझ करण्यात आले. कार्यालयातील उपस्थितीवरही नियंत्रण आणण्यात आले. सोमवारनंतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती पुन्हा कमी केली जाणार असल्याची माहिती आहे.
तीनही नमुने निगेटिव्ह आले आहेत. कार्यालय सॅनिटाइझ करण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने सर्वतोपरी उपाययोजना केली जाईल. उपस्थितीसंदर्भातही सूचना दिल्या जातील.
एन. रामबाबू, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख)
‘त्या’ कर्मऱ्याच्या संपर्कात अजून किती ?
पॉझिटिव्ह निघालेल्या बजेट विभागातील कर्मचाऱ्याच्या संपर्कात अजून किती कर्मचारी आले असावे, याचा अंदाज कुणालाच नाही. या कर्मचाºयाचे पब्लिसिटी विभागात नेहमी येणे-जाणे असायचे. यामुळे दोन्ही विभागांतील कर्मचारी धास्तावले आहेत.