वंचित बहुजन आघाडी ‘बूथ सेक्टर’ बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 10:25 AM2019-06-04T10:25:40+5:302019-06-04T10:27:53+5:30

नागपुरात तब्बल २६ हजारावर आणि रामटेकमध्ये ३६ हजारावर उमेदवारांनी मत घेऊन लक्ष वेधून घेतले. आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असून, नागपुरात वंचितने बूथ सेक्टर बांधणीचा निर्णय घेतला आहे.

Vanchit Bahujan Aghadi will build a 'booth sector' | वंचित बहुजन आघाडी ‘बूथ सेक्टर’ बांधणार

वंचित बहुजन आघाडी ‘बूथ सेक्टर’ बांधणार

googlenewsNext
ठळक मुद्देविधानसभेची तयारी सुरू जास्तीत जास्त शाखा उघडणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला नागपुरात महाराष्ट्रातील इतर भागाप्रमाणे भरघोस मते घेण्यास यश मिळाले नसले तरी नागपूर व रामटेकमध्ये वंचितच्या उमेदवारांना मिळालेली मते ही कमीसुद्धा गणता येणार नाही. नागपुरात तब्बल २६ हजारावर आणि रामटेकमध्ये ३६ हजारावर उमेदवारांनी मत घेऊन लक्ष वेधून घेतले. आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असून, नागपुरात वंचितने बूथ सेक्टर बांधणीचा निर्णय घेतला आहे.
वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघ नागपूर जिल्हातर्फे सीताबर्डी येथील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत प्रदेश महासचिव सागर डबरासे, शहराध्यक्ष रवी शेंडे, जिल्हाध्यक्ष नितेश जंगले, महिला आघाडीच्या वनमाला उके प्रामुख्याने उपस्थित होत्या.
या बैठकीत बूथ सेक्टर बांधणीवर विशेष जोर देण्यात आला. पक्षाचे संघटन जितके मजबूत होईल, तितका पक्षाला फायदा होईल. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बूथस्तरावर कार्यकर्ते तयार करावेत. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या जास्तीत जास्त शाखा उघडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत मिलिंद मेश्राम, हरीश नारनवरे, विशाल गोंडाणे, नालंदा गणवीर, अजय सहारे, शिवपाल मेश्राम, अतुल शेंडे, ग्रेस भगत, सुनील इंगळे, बालू हरकंडे, रवी वंजारी, रमेश कांबळे, कांचन देवगडे, प्रतिमा शेंडे, शालू अखंड, रेखा धुपे, भूपेश कांबळे, सिद्धार्थ भांगे, प्रशांत खोब्रागडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षविरोधी कार्य करणाऱ्यांवर होणार कारवाई
लोकसभा निवडणुकीत अनेक कार्यकर्त्यांनी पक्षविरोधात कार्य केल्याची तक्रार यावेळी अनेकांनी केली. पक्षविरोधी कार्य करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा निर्णयसुद्धा या बैठकीत घेण्यात आल्याचे महासचिव सागर डबरासे यांनी सांगितले.

Web Title: Vanchit Bahujan Aghadi will build a 'booth sector'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.