नागपूरच्या बिशप कॉटन स्कूलमध्ये दारूड्यांचा धिंगाणा; सामानाची तोडफोड, दारूच्या बाटल्या फेकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 01:08 PM2022-04-04T13:08:14+5:302022-04-04T13:13:16+5:30

नागपुरातील व्हीआयपी मार्गावर असलेल्या वनामती समोरील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बिशप कॉटन स्कूलमध्ये काही अज्ञातांनी शाळेच्या आत शिरून दारूच्या बाटल्या फेकून शाळेची तोडफोड केली.

Vandalism at bishop cotton school in nagpur, smashed liquor bottles has found in classroom | नागपूरच्या बिशप कॉटन स्कूलमध्ये दारूड्यांचा धिंगाणा; सामानाची तोडफोड, दारूच्या बाटल्या फेकल्या

नागपूरच्या बिशप कॉटन स्कूलमध्ये दारूड्यांचा धिंगाणा; सामानाची तोडफोड, दारूच्या बाटल्या फेकल्या

Next

नागपूर : नागपुरात दिवसेंदिवस गुंडांचा हैदोस वाढत चालला आहे. तर, आता शहरातील वर्दळीच्यी ठिकाणी असलेल्या शाळेत काही अज्ञातांनी घुसखोरी करत  शाळेतील वस्तूंची तोडफोड करून  दारूच्या बाटल्या फेकल्याचे केल्याचे समोर आले आहे. शाळेला दोन दिवस सुटी होती दरम्यान ही घटना घडली आहे.

नागपुरातील व्हीआयपी मार्गावर असलेल्या वनामती समोरील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बिशप कॉटन स्कूलमध्ये काही अज्ञातांनी शाळेच्या आत शिरून दारूच्या बाटल्या फेकून शाळेची तोडफोड केली. गेल्या काही वर्षात या ठिकाणी अशा घटना वारंवार घडत आहेत. मात्र, त्यावर आळा बसत नसल्याची शोकांतिका आहे.  या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेली दोन दिवस शाळेला सुट्टी होती. सुटी असल्यानं दारूड्यांनी शाळेला या ठिकाणी आपला अड्डा बनविला. यावेळी शनिवार व रविवारी समाजकंटक शाळेच्या आत शिरले व त्यांनी शाळेतील मालमत्तेची तोडफोड केली व दारूच्या बाटल्याही फेकल्या याप्रकरणी शाळेच्या प्राचार्य सोनिया सिंग यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 

Web Title: Vandalism at bishop cotton school in nagpur, smashed liquor bottles has found in classroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.