नागपुरात आता प्लॅटफॉर्म ८ वरूनच धावणार वंदे भारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2023 08:45 AM2023-05-24T08:45:00+5:302023-05-24T08:45:01+5:30

Nagpur News ‘कार टू कोच’ची सुविधा असलेल्या फलाट क्रमांक ८ वरूनच यापुढे नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना खासकरून, रुग्ण आणि वृद्धांना चांगला दिलासा मिळणार आहे.

Vande Bharat will now run from platform 8 in Nagpur | नागपुरात आता प्लॅटफॉर्म ८ वरूनच धावणार वंदे भारत

नागपुरात आता प्लॅटफॉर्म ८ वरूनच धावणार वंदे भारत

googlenewsNext

नागपूर : ‘कार टू कोच’ची सुविधा असलेल्या फलाट क्रमांक ८ वरूनच यापुढे नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना खासकरून, रुग्ण आणि वृद्धांना चांगला दिलासा मिळणार आहे.

उल्लेखनीय म्हणजे, नागपूर-बिलासपूरमार्गे धावणारी हायटेक वंदे भारत एक्स्प्रेस १४ मे पासून बंद करून तिच्या जागी तात्पुरत्या रूपात तेजस एक्स्प्रेस चालविण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली होती. १४ मे पासून तसा बदलही झाला. यामुळे रेल्वे प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करून ती गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यामुळे तीनच दिवसांत पुन्हा नेहमीप्रमाणे वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली. मात्र, ती फलाट क्रमांक सातवरून सोडली जात असल्याने वृद्ध, दिव्यांग आणि आजारी प्रवाशांना मोठा त्रास होत होता.

माजी खा. डॉ. विकास महात्मे आणि रेल्वे उपभोक्ता समितीचे सल्लागार विजय ढवळे यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांना फलाट क्रमांक सात प्रवाशांच्या दृष्टीने कसा गैरसोयीचा आहे, ते सांगितले. शिवाय वंदे भारत नागपुरातून फलाट क्रमांक ८ वरूनच चालविण्याची विनंती केली होती. या फलाटावरून प्रवाशांना थेट वे कार टू कोच’ची आणि खानपानासंबंधीच्या अन्य सुविधा असल्याचेही सांगितले होते. ते लक्षात घेऊन रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यासंबंधाने निर्देश दिले. त्यामुळे आता वंदे भारत एक्स्प्रेस फलाट क्रमांक आठवरूनच सुटणार असल्याचे सांगितले जाते.

-----

Web Title: Vande Bharat will now run from platform 8 in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.