'वंदे मातरम्'वरुन राजकारण नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:16 AM2017-08-15T01:16:09+5:302017-08-15T11:19:24+5:30
देशातील सांस्कृतिक राष्ट्रवाद वाढीसाठी वंदेमातरम्चा आवाज देशात टिकला पाहिजे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील सांस्कृतिक राष्ट्रवाद वाढीसाठी वंदेमातरम्चा आवाज देशात टिकला पाहिजे. वंदेमातरम्वरून राजकारण व्हायला नको, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी सोमवारी केले. मातृभूमी प्रतिष्ठान नागपूरतर्फे सक्करदरा चौक येथे आयोजित अखंड भारत संकल्प दिन सामूहिक वंदेमातरम् कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, नागो गाणार, डॉ. उपेंद्र कोठेकर, आयोजक डॉ. रवींद्र भोयर, सत्कारमूर्ती निवृत्त बिग्रेडियर रूपचंद जैस आदी उपस्थित होते.
२०१४ च्या निवडणुकीनंतर देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे खंबीर नेतृत्व मिळाले आहे. देशाला स्वामी विवेकानंद यांच्या विचाराचा देश बनवायचा आहे. त्यांनी २०२२ सालापर्यंत भारताला विश्वगुरू करण्याचा संकल्प के ला आहे. आईच्या चरणात नतमस्तक होण्यासाठी वंदेमातरम् म्हणण्यात गैर काय अशी भूमिका संबीत पात्रा यांनी मांडली.
देशातील सांस्कृतिक राष्ट्रवाद बिघडला आहे. अतिराष्ट्रवाद होत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप काही लोकांकडून केला जात आहे. परंतु देशाला शांती देणारी संस्कृती राष्ट्रवाद कसा बिघडवणार असा सवाल त्यांनी केला.
तरुण पिढीत आत्मविश्वास जागृत व्हावा. संस्कृतीची जाणीव व्हावी, या हेतूने मातृसेवा प्रतिष्ठानतर्फे गेल्या पाच वर्र्र्र्षांपासून सामूहिक वंदेमातरम् कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या सामाजिक उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आयोजक डॉ. रवींद्र भोयर यांनी प्रस्ताविकातून दिली.
यावेळी संबीत पात्रा यांच्याहस्ते बिग्रेडियर रूपचंद जैस, मेजर प्रभाकर पुराणिक, हेमंत जकाते, शहीद मेजर सुरेंद्र देव यांच्या पत्नी अनुराधा देव, हवालदार अण्णप्पा जाधव, शहीद सुनील नखाते यांच्या पत्नी कल्पना नखाते आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अॅड. अभिजित वंजारी, संजय भेंडे, किशोर कुमेरिया, रमेश सिंगारे, नगरसेवक संजय महाकाळकर, सतीश होले, दिव्या धुरडे, हरीश दिक ोंडवार, उषा पॅलेट, शीतल कामडे, नागेश सहारे, दीपक चौधरी, वंदना झलके , मंगला गवरे, स्वाती आखतकर, रिता मुळे, स्नेहल बिहारे, वंदना भगत, भारती बुन्डे, राजू नागुलवार, नयना झाडे, सत्यजित दस्तुरे, दिनेश कराळे, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ईश्वर धिरडे, संयोजक दीपक धुरडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.