खेलो इंडियासाठी विद्यापीठाच्या संघाची घोषणा, ३९ खेळाडूंचा सहभाग
By आनंद डेकाटे | Published: February 17, 2024 04:05 PM2024-02-17T16:05:42+5:302024-02-17T16:07:32+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरु डॉ. संजय दुधे यांच्या हस्ते विद्यापीठ संघाचे कर्णधार कल्याणी चुटे आणि यश गुल्हाने यांना ध्वज वितरण करण्यात आले.
नागपूर : खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या विद्यापीठ संघ जाहीर झाला आहे. या संघाला ध्वज प्रदान करण्याचा सोहळा रवी नगरातील क्रीडा परिसरात पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरु डॉ. संजय दुधे यांच्या हस्ते विद्यापीठ संघाचे कर्णधार कल्याणी चुटे आणि यश गुल्हाने यांना ध्वज वितरण करण्यात आले.
याप्रसंगी विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे सदस्य डॉ. धनंजय वेळुकर, अरुणराव कलोडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन जंगीटवार, विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. संजय चौधरी, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद सुर्यवंशी उपस्थित होते. विद्यापीठातर्फे योगासन, अॅथलेटिक्स, फेन्सिंग, टेबलटेनिस, बॉक्सिंग, कुस्ती या क्रीडा प्रकारात सुमारे ३९ खेळाडू सहभागी होणार आहे.
यात योगासन संघ- वैभव श्रीरामे, प्रणय कंगाले, वंश खिंची , हर्षल चुटे , वैभव देशमुख, ओम राखडे . कल्याणी चुटे, सुहानी गिरीपुंजे , छकुली सेलोकार, रचना अंबुलकर , अलिशा गायमुखे , श्रेया धामडे .
अॅथलेटिक्स- सौरव तिवारी , राजन यादव, आदर्श भुरे , नेहा ढबाले , रिया दोहतरे , मिताली भोयर.
बॉक्सिंग- युवराज शेराम , अभिषेक जांगीड.
फेन्सिंग- आरुषी सिंग, निलोफर पठाण, तन्नु डुंबारे, हिमानी घोडमारे.
जलतरण- रिद्धी परमार , स्नेहल जोशी, संजना जोशी, अक्षता झाडे, यश गुल्हाने.
कुस्ती- संदीप, प्रमोद कुमार, रोहित सिंग, बिरेंद्रर धांडा , कुणाल कुमार
टेबलटेनिस- वैभव राणे , जयेश कुळकर्णी, आदी चिटणीस , रजत तोरसकर , कौस्तुभ उदार.