वरुण गांधी भाजपाकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:55 AM2017-08-12T00:55:06+5:302017-08-12T00:55:27+5:30

एकेकाळी भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये मोजले जाणारे व युवकांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून प्रोजेक्ट केले जाणारे खासदार वरुण गांधी यांची शुक्रवारी भाजपाकडून फारशी दखल ....

Varun Gandhi ousted from BJP | वरुण गांधी भाजपाकडून बेदखल

वरुण गांधी भाजपाकडून बेदखल

googlenewsNext
ठळक मुद्देस्वागतासाठी मोठे नेते नाहीत : कार्यकर्त्यांचीही गर्दी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकेकाळी भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये मोजले जाणारे व युवकांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून प्रोजेक्ट केले जाणारे खासदार वरुण गांधी यांची शुक्रवारी भाजपाकडून फारशी दखल न घेण्यात आल्याचे पहायला मिळाले. एका कार्यक्रमासाठी नागपुरात आलेल्या वरुण गांधी यांच्या स्वागतासाठी भाजपाचे मोठे नेते तर दूरच पण एरव्ही विमानतळावर हारतुरे घेऊन आघाडीवर राहणारे सक्रिय कार्यकर्तेही पोहचले नाहीत. भाजपाकडून गांधी यांना अशी वागणूक का मिळाली हा चर्चेचा विषय ठरला आहे.
भाजपाच्या राजकारणात नागपूरचे वाढलेले महत्त्व विचारात घेता येथे येणाºया भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांचे जोशात स्वागत होत असल्याचे पहायला मिळते. वरुण गांधी यांचे दुपारी १२ च्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भाजपाचे नेते उपस्थित नव्हते. हे चित्र पाहून तेथे उपस्थित त्यांच्या समर्थकांनाही धक्का बसला. त्यानंतर गांधी हे एका हॉटेलमध्ये पोहचले. तेथेही त्यांच्या भेटीसाठी भाजपाचे नेते किंवा कार्यकर्ते पोहचले नाहीत. विधानसभा अधिवेशन सुरू असल्यामुळे सर्व आमदार मुंबईत आहेत. त्यामुळे मोठे नेते उपस्थित नव्हते, असा खुलासा भाजपाच्या एका नेत्याने केला.
मात्र, स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, नगरसेवक यांनीही सपशेल पाठ फिरविली. भाजपाकडून न मिळालेला प्रतिसाद वरुण गांधी यांनाही खटकल्याचे जाणवले. त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी असे काहीच नाही म्हणत विषय टाळला.

शेतकºयांच्या प्रश्नावर सरकार संवेदनशील असावे
प्रत्येक राज्य सरकारने शेतकºयांच्या प्रश्नांवर संवेदनशील असले पाहिजे. मग तो प्रश्न कृषी अनुदानाचा असो की कर्जमाफीचा. उत्तर प्रदेशमध्ये कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकºयांना मदत करण्यासाठी आपण स्वत: सव्वा कोटी रुपये दिले. त्यानंतर दानदात्यांकडून २६ कोटी रुपये गोळा करून ते सुमारे चार हजार शेतकºयांना वितरित करण्यात आले, असेही गांधी यांनी सांगितले.
कुणाच्या आशीर्वादाशिवाय तरुणांना
राजकारणात पद मिळत नाही
देशात अनेक तरुण व सामान्य लोक आहेत, ज्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे, गुणवत्ता आहे. मात्र, त्यांना राजकारणात प्रवेश करण्यासाठी खूप धडपड करावी लागते. जोवर एखाद्या बड्या व्यक्तीचा आशीर्वाद मिळत नाही तोवर युवकांना राजकारणात महत्त्वाचे पद मिळत नाही. हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे, असे मत वरुण गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. देश स्वतंत्र झाला तेव्हा भारतीयांचे सरासरी वय ३८ होते. आता ते कमी होऊन २४ वर आले आहे. देश तरुण झाला आहे. दुसरीकडे त्यावेळी खासदारांचे सरासरी वय ४५ होते. ते आता ५९ पर्यंत वाढले आहे. ही दरी भरावी लागेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. खासदारांचे वेतन व भत्ते ठरविण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात यावा. वेतन वाढविण्याचा अधिकार खासदारांना नसावा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

Web Title: Varun Gandhi ousted from BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.