वसंतराव नाईक यांचे विदर्भ विकासात योगदान
By admin | Published: August 19, 2015 03:06 AM2015-08-19T03:06:34+5:302015-08-19T03:06:34+5:30
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ वसंतराव नाईक यांनी कारभार सांभाळला.
प्रवीण दटके : चौकाला वसंतराव नाईक यांचे नाव
नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ वसंतराव नाईक यांनी कारभार सांभाळला. महाराष्ट्रासोबतच विदर्भाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते, असे प्रतिपादन महापौर प्रवीण दटके यांनी मंगळवारी केले. त्यांच्या हस्ते विधानभवनाकडून झिरोमाईलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चौकाचे वसंतराव नाईक असे नामकरण करण्यात आले.
महपालिका व भारतीय आदिवासी भटक्या -विमुक्त युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमदार सुधाकर देशमुख,भारतीय आदीवासी भटक्या -विमुक्त युवा संघटनेचे राजू चव्हाण आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
नाईक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील महुली या लहानशा खेड्यात झाला होता. त्यांनी पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद भूषविले होते.
ते सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात शेती विकासाच्या अनेक योजना राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वसंतराव नाईक यांची ओळख हरितक्रांतीचे प्रणेते अशी होती. कृषी क्षेत्रासोबतच राज्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान असल्याचे सुधाकर देशमुख यांनी आपल्या भाषणातून सांगितले. झोन सभापती वर्षा ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व मनपातील अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)