हत्तीपाय रोगासाठी व्हॅस्क्यूलराईज्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:29 AM2020-11-22T09:29:43+5:302020-11-22T09:29:43+5:30

\Sनागपूर : डॉ. सुरेश चवरे (हेअर ट्रान्स्प्लॅन्ट, मायक्रोव्हॅस्क्युलर प्लास्टिक सर्जन) आणि त्यांच्या टीमने नागपूरच्या विम्स हॉस्पिटल व सौंदर्य ...

Vascularized for elephantiasis | हत्तीपाय रोगासाठी व्हॅस्क्यूलराईज्ड

हत्तीपाय रोगासाठी व्हॅस्क्यूलराईज्ड

googlenewsNext

\Sनागपूर : डॉ. सुरेश चवरे (हेअर ट्रान्स्प्लॅन्ट, मायक्रोव्हॅस्क्युलर प्लास्टिक सर्जन) आणि त्यांच्या टीमने नागपूरच्या विम्स हॉस्पिटल व सौंदर्य सिटी-हेअर ट्रान्सप्लँट आणि प्लास्टिक सर्जरी क्लिनिक, नागपूर येथे मध्य भारतात पहिल्यांदाच हत्तीपाय (लिम्फॅडेमा) रोगासाठी अत्यंत दुर्मिळ, नवीनतम आणि जटिल शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया छिंदवाडा येथील राकेश यांच्या पायावर करण्यात आली. ते सहा वर्षांपासून हत्तीपायाने पीडित होते. त्यांना लिम्फ नोड ट्रान्सफर करण्याचा पर्याय दिला आणि त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परिणाम सहा महिन्यांत येऊ लागले आणि आज सूज ९० टक्क्यांनी कमी झाली आहे. व्हॅस्क्युलर लिम्फ नोड ट्रान्सफर हे लिम्फडेमा किंवा हत्तीपाय रोगासाठी एक वरदान आहे. शस्त्रक्रियेसाठी डॉ. गिरीश ठाकरे आणि डॉ. मीनाक्षी हांडे यांनी भूल दिली तर राजकुमार, संतोष, सुखदेव आणि चंदा यांनी सहकार्य केले. डॉ. प्रियदर्शन हांडे आणि डॉ. राजेश सिंघानिया हे टीमचे सदस्य होते. (वा.प्र.)

Web Title: Vascularized for elephantiasis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.