रानभाजी महोत्सवातून आरोग्यवर्धक भाज्या नागरिकांपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:12 AM2021-08-12T04:12:42+5:302021-08-12T04:12:42+5:30
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा)अंतर्गत स्थानिक पंचायत समितीच्या आवारात जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा)अंतर्गत स्थानिक पंचायत समितीच्या आवारात जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर रानभाजी महोत्सवात तालुक्यातील ४० शेतकरी गटांनी सहभाग घेतला होता. कुड्याची फुले, बहावाची फुले, तरोटा, शेरडिरे, अरथफरीची भाजी, उंदीर कांदे, बांबूचे वास्ते, लंगडा भाजी, पातूरची भाजी, खापरकुट्टी, सुरण, गुळवेल, शेवगा, अडूची पाने, आंबाडीची भाजी, काटवल, घोळ भाजी अशा विविध दुर्मिळ आरोग्यवर्धक रानभाज्या एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळाली. शहर व तालुक्यातील नागरिकांनी महोत्सवाला भेट देत, रानभाज्या खरेदी केल्या. यावेळी आ. राजू पारवे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, सभापती ममता शेंडे, जि.प. सदस्य शंकर डडमल, कृष्णाजी घोडेस्वार, राहुल मसराम, तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे, सहायक गटविकास अधिकारी, रोशनकुमार दुबे, मंडळ अधिकारी श्याम गिरी, मनोज रोंगटे, रवींद्र शेंडे, सचिन गणवीर आदी उपस्थित होते.