भाजी विक्रेत्या तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:22 AM2017-11-02T01:22:04+5:302017-11-02T01:22:14+5:30

जरीपटकाच्या मंगळवारी बाजारात जुन्या वैमनस्यातून आरोपींनी एका भाजी विक्रेत्या युवकाचा खून केला. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

Vegetable vendor youth murder | भाजी विक्रेत्या तरुणाचा खून

भाजी विक्रेत्या तरुणाचा खून

googlenewsNext
ठळक मुद्देतिघांना अटक : जरीपटका परिसरात खळबळ, जुन्या वैमनस्यातून घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटकाच्या मंगळवारी बाजारात जुन्या वैमनस्यातून आरोपींनी एका भाजी विक्रेत्या युवकाचा खून केला. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
समीर ऊर्फ सोनु शहा (२१) रा. वनदेवीनगर असे मृताचे नाव आहे. जरीपटका पोलिसांनी खुनाचे सूत्रधार ऋषभ राजू खापेकर (१९) रा. बिनाकी मंगळवारी, शेख फय्याज ऊर्फ बाबू साहब (२१) रा. यशोधरानगर आणि त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारास अटक केली आहे. सोनू आठवडी बाजारात टमाटर विकत होता. त्याची ऋषभसोबत मैत्री होती. तीन महिन्यापूर्वी पैशावरून दोघात वाद झाला होता. वाद झाल्यानंतर दोन दिवसांनी ऋषभ, बाबू साहबला घेऊन सोनूच्या घरी आला होता. त्यांनी सोनूवर हल्ला केला होता. मदतीसाठी आलेल्या सोनूच्या भावालाही त्यांनी जखमी केले होते.
या हल्ल्यात बाबू साहबही गंभीर जखमी झाला होता. याबाबत यशोधरानगर ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर आरोपींचा सोनूसोबत वाद सुरू होता. सोनू आपल्याला इजा पोहोचवू शकतो, अशी आरोपींना भीती होती. सोनू हा वाद विसरला होता. आरोपी अनेक दिवसांपासून सोनूला धडा शिकविण्याच्या तयारीत होते. मंगळवारी सोनू आठवडी बाजारात टमाटर विकत होता. रात्री १०.३० वाजता बाजार बंद होण्याची वेळ झाल्यामुळे सोनू आपल्या मित्रासोबत बसला होता. त्याचवेळी एक युवक सोनूला बोलविण्यासाठी आला. सोनू त्याच्यासोबत सागर बीअर बारकडे गेला.
याच दरम्यान आरोपीही त्याचा शोध घेत तेथे पोहोचले. त्यांनी सोनूला घेरले. त्याचा जागेवरच शस्त्रांनी खून केला. या घटनेमुळे बाजारात एकच खळबळ उडाली. भाजी विक्रेते सामान गोळा करून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सोनूला मेयो रुग्णालयात पोहोचविले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ऋषभ खापेकर रेल्वेगाडीत खाद्यपदार्थ विकतो. बाबू साहब डोबीचा गुन्हेगार आहे. दोघांविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. हल्ला करताना आरोपींची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. ऋषभ आणि बाबू साहब सात ते आठ साथीदारांसह सोनूला शोधत होते. परंतु पोलीस तीन आरोपी असल्याचे सांगत आहेत. सोनूच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Vegetable vendor youth murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.