नागनदीच्या पाण्याने उत्पादित भाज्या आरोग्यासाठी घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:08 AM2021-03-10T04:08:32+5:302021-03-10T04:08:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागनदीच्या पाण्याद्वारे उत्पादित केल्या जाणाऱ्या भाज्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष ...

Vegetables produced by Nagandi water are harmful to health | नागनदीच्या पाण्याने उत्पादित भाज्या आरोग्यासाठी घातक

नागनदीच्या पाण्याने उत्पादित भाज्या आरोग्यासाठी घातक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागनदीच्या पाण्याद्वारे उत्पादित केल्या जाणाऱ्या भाज्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी विशेषज्ञांशी चर्चा करून या बाबतीतला रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नीरीमध्ये आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार उपस्थित होते.

शहरातून निघणाऱ्या सांडपाण्यातून नदी, नाले कोणत्याही स्थिती दूषित होऊ नये यासाठी प्रशासनाने पुढाकार घेत नागरिकांचा सहयोग घेण्याची गरज असल्याचे रवींद्र ठाकरे यांनी यावेळी म्हटले. सर्वांना शुद्ध पाणी देण्याचे लक्ष्य पुढे ठेवून, प्रशासनाने या संदर्भात काम करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. कामठी व कन्हान येथील जनशुद्धीकरण कार्यांना प्राथमिकता देण्याचे निर्देश देताना विशेषज्ञांनी या परिसराचे निरीक्षण करून चर्चा करण्याचे आवाहन केले.

-----------

बॉक्स ...

पालक, कोबी, वांगी यात नायट्रेटची मात्रा अधिक

नागनदीच्या क्षेत्रात उत्पादित होणाऱ्या पालक, वांगी, कोबी सारख्या भाज्यांमध्ये नायट्रेटची मात्रा अधिक असल्याने या भाज्या गडद रंगाच्या दिसत असल्याचे नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी यावेळी सांगितले.

............

Web Title: Vegetables produced by Nagandi water are harmful to health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.