उपराजधानीत भाज्या कडाडल्या; कोथिंबीर @३००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:18 PM2019-07-08T12:18:40+5:302019-07-08T12:20:22+5:30

गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोथिंबीर २०० रुपये किलो विकले जात असतानाच रविवारी अचानक वाढ होऊन कॉटन मार्केट ठोक बाजारात ३०० तर किरकोळमध्ये ३५० रुपयांपेक्षा जास्त भाव होते.

Vegetable's rate on high in Nagpur, Coriander @ 300 | उपराजधानीत भाज्या कडाडल्या; कोथिंबीर @३००

उपराजधानीत भाज्या कडाडल्या; कोथिंबीर @३००

googlenewsNext
ठळक मुद्देपावसामुळे भाज्या महाग स्थानिक व बाहेरून आवक कमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसामुळे कोथिंबीरचे बहुतांश पीक खराब झाले असून आवक फारच कमी आहे. नाशिक, नांदेड आणि छिंदवाडा येथून आवक बंद आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोथिंबीर २०० रुपये किलो विकले जात असतानाच रविवारी अचानक वाढ होऊन कॉटन मार्केट ठोक बाजारात ३०० तर किरकोळमध्ये ३५० रुपयांपेक्षा जास्त भाव होते. सर्वाधिक भाव असतानाही ग्राहकांनी खरेदी केल्याची माहिती महात्मा फुले बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
हिरव्या पालेभाज्यांची आवक कमी असली तरी पालक मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. रविवारी ठोकमध्ये १० रुपये तर किरकोळमध्ये २० रुपये भाव होते. याशिवाय मेथी पंढरपूर येथून येत असून ठोकमध्ये दर्जानुसार ८० ते १०० रुपये तर चवळी भाजी ३० रुपये किलो विकल्या गेली.
पंजाब, दिल्लीतून आवक
स्थानिक शेतकऱ्यांकडून हिरवी मिरचीची आवक बंद असून दिल्ली, पंजाब आणि जमशेदपूर येथून सुरू आहे. ठोकमध्ये ४० ते ५० रुपये भाव असून किरकोळमध्ये ६० ते ८० रुपये आहेत.
रविवारी किरकोळ बाजारातील भाव
कोथिंबीर ३५० रुपये, हिरवी मिरची ६० ते ८०, टमाटर ४०, फूलकोबी ४०, पत्ताकोबी ४०, वांगे ४०, कारले ८०, ढेमस ५०, भेंडी ५०, चवळी शेंग ६०, गवार ६०, लवकी ३०, कोहळे ४०, सिमला मिरची ८०, तोंडले ४०, परवळ ७०, मेथी १२०, पालक २०, चवळी भाजी ४०, काकडी ३०, गाजर ४०, मुळा ४०, कैरी ८०, फणस ५० रुपये.
स्थानिक शेतकऱ्यांकडून फुलकोबी, कारले, वांगे, भेंडी
नागपूर जिल्ह्याच्या २५ ते ३० कि़मी.च्या अंतरावरून फूलकोबी, ढेमस, वांगे, टमाटर, मोहाडहून कारले, मौद्याहून भेंडी, तुमसर व मौदा येथून चवळी व गवार शेंग, कळमेश्वर व सावनेरहून पालक व चवळी भाजी तर मदनपल्लीहून पत्ताकोबी, राजनांदगाव येथून लवकी, यवतमाळ व जळगावहून कोहळे, रायपूरहून सिमला मिरची, रायपूर, भिलाई, दुर्ग येथून तोंडले व परवळ, ओरिसा राज्यातून फणस, रायपूर येथून सिमला मिरची आणि देशाच्या अन्य भागातून काकडी, गाजर, मुळा, कैरी आदींची आवक आहे. कॉटन मार्केटमध्ये सरासरी लहान-मोठ्या ७० ते ८० गाड्या येत असल्याचे महाजन यांनी सांगितले.
कांदे व बटाट्याची विक्री कमी
कळमना कांदे, बटाटे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी म्हणाले, कांद्याची आवक चांगली असून विक्री कमी आहे. त्यानंतरही भाव वाढले आहेत. कळमना ठोक बाजारात भाव २० रुपये किलो, पण किरकोळमध्ये ३० ते ४० रुपये भाव आहेत. कळमन्यात पांढरे आणि लाल कांद्यांचे भाव ७०० ते ८०० रुपये मण (एक मण ४० किलो) आहेत. पांढरे कांदे अमरावती आणि अकोला येथे येतात. भाव परवडत नसल्यामुळे गुजरातेतून आवक बंद आहे. दररोज ८ ते १० ट्रक (एक ट्रक १० टन) येत आहेत. लाल कांद्याला जास्त मागणी असते. सध्या चाळीसगाव, बुलडाणा (शेगाव, खामगाव), मध्य प्रदेशातील सागर व रायसेन जिल्ह्यातून आवक आहे. दररोज १५ ते २० ट्रक (एक ट्रक १२ टन) कळमन्यात येत आहेत. पांढºया आणि लाल कांद्याचे पीक मार्चमध्ये आले. उन्हाळी कांदा साठवून ठेवता येतो. शेतकरी गरजेनुसार बाजारात विक्रीसाठी आणतात. लासलगाव, पिंपळगाव येथील दर्जेदार लाल कांदा पॅकिंगमध्ये मलेशिया आणि बांगलादेशात निर्यात करण्यात येत असल्याचे वसानी म्हणाले.
बटाट्याचे भाव स्थिर
यंदा उत्पादन जास्त झाल्यामुळे दोन महिन्यांपासून बटाट्याचे भाव स्थिर आहेत. मार्चमध्ये नवीन उत्पादन निघाले तेव्हा भाव दर्जानुसार ५०० ते ६०० रुपये मण होते. जास्त भाव मिळण्याच्या अपेक्षेने शेतकºयांनी माल कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला. पण मागणी कमी झाल्यानंतर शेतकºयांनी विक्रीस काढला. सध्या कळमन्यात ३५० ते ४०० रुपये मण भाव आहेत. दररोज २० ते २५ ट्रक (एक ट्रक १५ ते २० टन) बटाटे उत्तर प्रदेशातील आग्रा, इटावा, सिरसागंज येथून येत आहेत. सणासुदीत भाव वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Vegetable's rate on high in Nagpur, Coriander @ 300

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.