वाहन चाेरट्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:07 AM2021-06-01T04:07:32+5:302021-06-01T04:07:32+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क उमरेड : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिवापूर पाेलीस ठाण्यांतर्गतच्या सालेशहरी येथे कारवाई करीत एका वाहन चाेरट्यास ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिवापूर पाेलीस ठाण्यांतर्गतच्या सालेशहरी येथे कारवाई करीत एका वाहन चाेरट्यास अटक केली. त्याच्याकडून चाेरीच्या दाेन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. ही कारवाई रविवारी (दि.३०) करण्यात आली.
सुरेश संपत ठाकूर (२२, रा. कारगाव पुनर्वसन, सालेशहरी, ता. भिवापूर) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस पथक उमरेड उपविभागात गस्तीवर असताना, उमरेड शहरातून दुचाकी वाहन चाेरून आराेपीने आपल्या घरी ठेवले असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पाेलिसांनी सालेशहरी येथे सापळा रचून आराेपीस ताब्यात घेतले. आराेपीकडे एमएच-४०/एपी-८४०४ आणि एमएच-३२/आर-७०८८ क्रमांकाची दाेन दुचाकी वाहने आढळून आली. चाैकशीदरम्यान एमएच-४०/एपी-८४०४ क्रमांकाच्या दुचाकी चाेरीबाबत उमरेड पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे आढळले. तसेच एमएच-३२/आर-७०८८ क्रमांकाची दुचाकी ही निखिल भिंगारे, रा. धानाेली मेघे, ता. सेलू, जि. वर्धा यांच्या मालकीची असल्याचे चाैकशीत निष्पन्न झाले. पाेलिसांनी चाेरीच्या दाेन्ही दुचाकी जप्त करीत आराेपीस अटक केली.
याप्रकरणी उमरेड पाेलीस ठाण्यात आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, त्यास पुढील कारवाईसाठी उमरेड पाेलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात सहायक पाेलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, हवालदार संताेष पंधरे, मदन आसटकर, विनाेद काळे, राधेश्याम कांबळे, बालाजी साखरे यांच्या पथकाने केली.