वाहन चाेरट्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:12 AM2021-09-06T04:12:24+5:302021-09-06T04:12:24+5:30
बुटीबाेरी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहन चाेरट्यास यवतमाळ शहरातून ताब्यात घेत अटक केली आणि बुटीबाेरी पाेलिसांच्या स्वाधीन केले. ...
बुटीबाेरी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहन चाेरट्यास यवतमाळ शहरातून ताब्यात घेत अटक केली आणि बुटीबाेरी पाेलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याकडून चाेरीची माेटारसायकल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.
गजानन पुंडलिक राठाेड (२४, रा. देऊलवाडी, ता. आर्णी, जिल्हा यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या वाहन चाेरट्याचे नाव आहे. बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून काही दिवसांपूर्वी एमएच-४०/जे-९६५७ क्रमांकाची माेटारसायकल चाेरीला गेली हाेती. या घटनेचा बुटीबाेरी पाेलिसांसाेबतच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपासाला सुरुवात केली हाेती.
ही माेटारसायकल गजानन राठाेड याने चाेरून नेल्याचे तसेच ताे माेटारसायकल घेऊन यवतमाळला गेल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पाेलीस अधिकाऱ्यांना मिळाली हाेती. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यवतमाळ शहर गाठून शिताफीने ताब्यात घेतले. चाैकशीदरम्यान त्याच्याकडील एमएच-४०/जे-९६५७ क्रमांकाची माेटारसायकल चाेरीची असल्याचे तसेच त्याने ती सातगाव (बुटीबाेरी) येथून चाेरून नेल्याचे पाेलिसांना सांगितले. त्यामुळे त्याला लगेच अटक करून माेटारसायकल जप्त करण्यात आली. त्या माेटारसायकलची किंमत १५ हजार रुपये असल्याचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी सांगितले.
त्याच्याकडून वाहन व इतर चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, हवालदार गजेंद्र चाैधरी, महेश जाधव, रामराव आडे, अमृत किनगे यांच्या पथकाने केली.