नागपूर जिल्ह्यात निवडणुकीसाठी वाहने मिळेनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 11:03 AM2019-09-27T11:03:46+5:302019-09-27T11:06:00+5:30

या निवडणुकीसाठी १६१० वाहनांची आवश्यकता लागणार आहे. मात्र, विविध विभागांकडून वाहन देण्यास टाळाटाळ होत आहे. आजवर निवडणूक विभागाकडे केवळ २०० वाहनेच विविध विभागांकडून जमा झाली आहे.

Vehicles not available for election in Nagpur district! | नागपूर जिल्ह्यात निवडणुकीसाठी वाहने मिळेनात!

नागपूर जिल्ह्यात निवडणुकीसाठी वाहने मिळेनात!

Next
ठळक मुद्देआवश्यकता १६१० वाहनांची, आजवर २०० वाहनेच जमा -तर अधिकाऱ्यांवर शिस्तभंग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, येत्या २१ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील १२ ही विधानसभा मतदार संघासाठी मतदान होऊ घातले आहे. या निवडणुकीसाठी १६१० वाहनांची आवश्यकता लागणार आहे. मात्र, विविध विभागांकडून वाहन देण्यास टाळाटाळ होत आहे. आजवर निवडणूक विभागाकडे केवळ २०० वाहनेच विविध विभागांकडून जमा झाली आहे. विनंती करुनही वाहन देण्यास टाळाटाळ केल्यामुळे येत्या काळात अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईही देखील करण्याची तयारी निवडणूक विभागाने चालविली असल्याची माहिती आहे.
निवडणुकीदरम्यान होणाऱ्या प्रचार सभेवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच इतर कामासाठी निवडणूक विभागाला १६१० वाहनांची आवश्यक आहे. यात जीप, बस, ट्रक, अ‍ॅम्ब्युलन्स, अग्निशमनच्या वाहनांचा समावेश आहे. यात काही वाहने कंत्राटी पध्दतीनेही घेण्यात येणार असून काही वाहने शासकीय विभागांकडून घेण्यात येणार आहे. आजवर विभागाकडे जवळपास २०० वाहन जमा झाले असल्याची माहिती आहे. अनेक शासकीय विभागांच्या प्रमुखांना वारंवार पत्रव्यवहार व फोन करुनही त्यांच्याकडून वाहन देण्यास टाळाटाळ होत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम, वनविभागातील जवळपास १०० बड्या अधिकाऱ्यांकडून वाहन देण्यासाठी टाळाटाळ होत असल्यामुळे याविरुध्द वाहन जप्तीची मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान त्या अधिकाऱ्यांची वाहने भर रस्त्यात जप्त करुन त्यांना आहे त्या ठिकाणीच वाहनातून खाली उतरवून वाहन निवडणूक प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
राष्ट्रीय कामासाठी वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याने आता प्रशासनाने थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याने जप्तीची कारवाई निवडणूक प्रशासनाकडून सुरूच आहेत. तर ज्या ज्या विभागांकडून अद्यापही वाहने जमा करण्यात आली नाही, त्यांना लवकरात लवकर निवडणूक प्रशासनाकडे (विभागाकडे) वाहन जमा करण्याच्या सूचनाही करण्यात आल्याची माहिती आहे. जिल्हा निवडणूक विभागाने वाहन जप्तीसाठी जिल्ह्यात सहा पथक तयार केले असून यात वाहतुक पोलीस, आरटीओ तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Web Title: Vehicles not available for election in Nagpur district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.