वेकाेलिने ‘एसटीपी’ची व्यवस्था करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:37 AM2021-02-05T04:37:18+5:302021-02-05T04:37:18+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : वेकाेलि कामठी उपक्षेत्रांतर्गतच्या कामठी व इंदर खुल्या खाणीतून काेळसा उत्खनन करताना दूषित पाणी कन्हान ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : वेकाेलि कामठी उपक्षेत्रांतर्गतच्या कामठी व इंदर खुल्या खाणीतून काेळसा उत्खनन करताना दूषित पाणी कन्हान नदीपात्रात साेडले जाते. यामुळे नदीपात्र प्रदूषित हाेत आहे. शिवाय, या नदीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हाेत असल्याने नागरिकांच्या आराेग्यास धाेका निर्माण झाला आहे. त्यामुळे वेकाेलि प्रशासनाने नदीपात्रात दूषित पाणी साेडणे थांबवून त्याठिकाणी दाेन एसटीपी (सिवेज ट्रीटमेंट प्लांट) लावून साेडावे, अशी मागणी माजी खा. प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केली आहे. याबाबत कामठी उपक्षेत्र प्रबंधक सुरेश तळणकर यांना निवेदन दिले आहे.
कामठी व इंदर खुली खाणीतून कोळसा उत्खनन करताना दररोज दूषित पाणी बाहेर फेकले जाते. हे पाणी कांद्री, सुरेशनगर, धरमनगर, पिपरीजवळील नाल्याने घाण व दूषित पाणी कन्हान नदीपात्रात बिनधास्तपणे सोडल्या जात आहे. यामुळे कन्हान नदीपात्र मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. या नदीतून कन्हान, कांद्री व परिसरातील नागरिकांना फक्त ब्लिचिंग टाकून पिण्याकरिता पाणीपुरवठा केला जाताे. त्यामुळे नागरिकांना आजाराची शक्यता बळावली आहे. वेकोलिने कोळसा खाणीचे दूषित पाणी नदीपात्रात सोडणे त्वरित थांबवावे. तसेच कन्हान नदीत मिळणाऱ्या कामठी खुली खाणीच्या धरमनगर पिपरीजवळील नाल्यावर आणि इंदर खुली खाणीच्या गाडेघाट जवळील नाल्यावर असे दोन एसटीपी लावून पाणी स्वच्छ करून साेडले जावे, जेणेकरून कन्हान नदी प्रदूषित हाेणार नाही तसेच परिसरातील नागरिकांचे आरोग्य सांभाळता येईल. यावेळी माजी खासदार तथा ग्रामोन्नती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्यासह दिलीप राईकवार, कमलेश पांजरे, मोतीराम रहाटे, गणेश भोंगाडे, प्रमोद निमजे, सिन्नू विणेवार, कमलसिंग यादव, अजय ठाकरे, प्रवीण गोडे, आकाश पंडितकर, रवींद्र दुपारे, रूपेश सातपुते, किशोर बावनकुळे, विजय तिवारी, कमल यादव, मनीष गोल्लर, नीलेश गाढवे, केतन भिवगडे, श्याम मस्के आदी उपस्थित होते.