फूटपाथवर विक्रेत्यांचे अतिक्रमण (औरंगाबाद डमीचा विषय)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:08 AM2020-12-06T04:08:31+5:302020-12-06T04:08:31+5:30
रस्त्यावरून चालावे लागते पायी : जीव मुठीत घेऊन चालतात नागरिक नागपूर : नागपूर शहरात सगळीकडे नागरिकांना पायी चालण्यासाठी फूटपाथ ...
रस्त्यावरून चालावे लागते पायी : जीव मुठीत घेऊन चालतात नागरिक
नागपूर : नागपूर शहरात सगळीकडे नागरिकांना पायी चालण्यासाठी फूटपाथ तयार केलेले आहेत. परंतु या फूटपाथचा ताबा विक्रेत्यांनी घेतला आहे. शहरात सर्वत्र विक्रेत्यांनी फूटपाथवर आपली दुकाने थाटल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.
नागपूर शहरात सगळीकडे रस्त्याला लागून फूटपाथ तयार करण्यात आले आहेत. या फूटपाथवरून नागरिकांना चालण्यासाठी महापालिकेने व्यवस्था करून दिली. परंतु या फूटपाथचा ताबा किरकोळ विक्रेत्यांनी घेतल्याचे चित्र आहे. विक्रेत्यांनी फूटपाथ व्यापून टाकल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरातील फूटपाथ मोकळे करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
..............
स्वस्त वस्तूसाठी होतेय नागरिकांची गर्दी
शहरातील फूटपाथवर दुकान थाटलेल्या विक्रेत्यांच्या दुकानात नागरिकांना स्वस्त दरात वस्तू मिळतात. मोठमोठ्या दुकानात ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतात. परंतु फूटपाथवर स्वस्त दरात वस्तू मिळतात. कपडे, घरगुती वापराचे साहित्य, शोभेच्या वस्तू, खेळणी या वस्तू अतिशय स्वस्त दरात मिळत असल्यामुळे ग्राहक फूटपाथवरील दुकानात गर्दी करतात.
कोरोनाची लागण होण्याची भीती
फूटपाथवर स्वस्त दरात वस्तू मिळत असल्यामुळे एकाच दुकानात ग्राहकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. सीताबर्डी, महाल, सक्करदरा आदी भागातील फूटपाथवर मोठ्या संख्येने नागरिक वस्तू खरेदी करण्यासाठी गोळा होतात. त्यांच्यात फिजिकल डिस्टन्सिंग राहत नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती राहते. परंतु फूटपाथवरील विक्रेतेही ग्राहकांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचा आग्रह धरताना दिसत नाहीत.
‘फूटपाथवरील विक्रेत्यांवर होते कारवाई’
फूटपाथवर दुकान थाटल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते. महापालिकेच्या वतीने फूटपाथवर दुकान थाटणाऱ्या विक्रेत्यांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येते. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.`
राधाकृष्णन बी. महापालिका आयुक्त
...........