कोविड केअर ऑन व्हीलला अत्यल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:07 AM2021-05-14T04:07:56+5:302021-05-14T04:07:56+5:30

नागपूर : कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करून देता यावेत यासाठी कोविड केअर ऑन व्हील अर्थात रेल्वे डब्यात रुग्णालय सुरू ...

Very little response to Covid Care on Wheels | कोविड केअर ऑन व्हीलला अत्यल्प प्रतिसाद

कोविड केअर ऑन व्हीलला अत्यल्प प्रतिसाद

Next

नागपूर : कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करून देता यावेत यासाठी कोविड केअर ऑन व्हील अर्थात रेल्वे डब्यात रुग्णालय सुरू करण्यात आले. परंतु, या व्यवस्थेला रुग्णांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. दहा दिवसांमध्ये येथे केवळ १६ रुग्णांनीच उपचार घेतले. १७६ रुग्णांवर उपचाराची व्यवस्था असताना मंगळवारी केवळ तीनच रुग्ण दाखल होते.

पहिल्या लाटेत कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असतानाच आणीबाणीच्या काळासाठी सज्जता म्हणून रेल्वेने कोचेसमध्ये बदल करून रुग्ण ठेवण्याची व्यवस्था करून ठेवली होती. यंदा एप्रिलअखेरीस उपराजधानीत दररोज आठ हजारांवर पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत असतानाच मृत्युसंख्याही शंभरावर पोहोचली होती. कोरोनाने हाहाकार उडवून दिला असतानाच औषध, ऑक्सिजन, बेडचा तुटवडा जाणवला. अशा कठीण प्रसंगात रुग्णांवर उपचाराची व्यवस्था असलेले रेल्वे डबे आवश्यक उपाययोजनेनंतर २ मे रोजी महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले. अजनीतील कंटेनर डेपोत ही रॅक ठेवण्यात आली असून, येथे कोरोना रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. रेल्वेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देल्या दहा दिवसांमध्ये येथे केवळ १६ रुग्णांनीच उपचार करून घेतले. मंगळवारी केवळ तीनच रुग्ण येथे दाखल होते. रुग्णांकडून प्रतिसाद न मिळण्याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

...................

स्थळ बदलण्याची मागणी

ऑक्सिजनच्या उपलब्धतेसह बेड उपलब्ध असल्याने रुग्णांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा होती. प्रारंभी हे डबे नागपूर स्टेशनच्या फलाट प्लॅटफॉर्म ८ वर ठेवण्याची तयारी होती. ऐनवेळी स्थान बदलले गेले. कंटेनर डेपोत फारसे कुणाचे येणे-जाणे नसल्याने संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने ही जागा उपयुक्त होती. परंतु. नर्जन ठिकाण असल्यानेच रुग्ण येण्यास धजावत नसल्याची बाब समोर आली आहे. डबे अजनी, नागपूर स्टेशन किंवा वस्तीपासून नजीकच्या ठिकाणी ठेवल्यास त्याचा अधिक उपयोग होऊ शकेल. यामुळे स्थान बदलण्याची मागणी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

...

.....

Web Title: Very little response to Covid Care on Wheels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.