नागपुरातील ज्येष्ठ चित्रकार शकुंतला सातपुते यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:29 AM2019-06-13T00:29:04+5:302019-06-13T00:32:44+5:30
गिरीपेठ येथील रहिवासी, ज्येष्ठ चित्रकार व लेखिका शकुंतला शिवाजीराव सातपुते यांचे बुधवारी निधन झाले. शहरात कि ल्ले चळवळ चालविणारे सामाजिक कार्यकर्ते रमेश सातपुते यांच्या त्या आई होत. त्यांच्या इच्छेनुसार मरणोपरांत नेत्रदान करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गिरीपेठ येथील रहिवासी, ज्येष्ठ चित्रकार व लेखिका शकुंतला शिवाजीराव सातपुते यांचे बुधवारी निधन झाले. शहरात कि ल्ले चळवळ चालविणारे सामाजिक कार्यकर्ते रमेश सातपुते यांच्या त्या आई होत. त्यांच्या इच्छेनुसार मरणोपरांत नेत्रदान करण्यात आले. अंबाझरी घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शकुंतला सातपुते या चित्रसम्राट दादासाहेब धनवटे यांच्या कन्या होत. मुंबईच्या कला महाविद्यालयात मेरिटने उत्तीर्ण झालेल्या शकुंतला यांच्या कलाकृतींना अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून, देश-विदेशातील कला संग्रहामध्ये प्रदर्शितही झाल्या आहेत. त्यांनी काढलेले शिवाजी महाराजांवरील तैलचित्र किल्ले रायगड समारंभात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना प्रदान करण्यात आले होते. त्यांनी ‘पूर्णाहुती’ या आत्मचरित्रासह वन्यजीवांवर ‘वन सम्राटाच्या साम्राज्यात’ आणि ‘द्विजन्मा’ हा पक्षिकोष आदी पुस्तकांचे लेखनही केले आहे.