मंदिरे उघडण्यासाठी विहिंपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:10 AM2021-09-18T04:10:10+5:302021-09-18T04:10:10+5:30
नागपूर : कोरोनामुळे बंद असलेली मंदिरे तत्काळ उघडण्यात यावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे राजाबक्षा येथील हनुमान मंदिरात शुक्रवारी ...
नागपूर : कोरोनामुळे बंद असलेली मंदिरे तत्काळ उघडण्यात यावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे राजाबक्षा येथील हनुमान मंदिरात शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी शासनातर्फे जाणूनबुजून मंदिरे बंद ठेवण्यात आली असून, काही धर्मांच्या प्रार्थनास्थळांत गर्दी होत नसतानाही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. बार, रेस्टॉरंट सर्वच खुले असताना, केवळ मंदिरातूनच कोरोनाचा प्रसार होतो का, असा सवाल विहिंपतर्फे करण्यात आला.
विहिंप कार्यकर्त्यांनी मंदिरात आरती करून आंदोलनाला सुुरुवात केली. यावेळी संत भागीरथ महाराज, विहिंपचे प्रांत मंत्री गोविंद शेंडे, विहिंप महानगर मंत्री प्रशांत तितरे, सहमंत्री संजय मुळे, उपाध्यक्ष अमित बेंबी, मठमंदिर संपर्क प्रमुख राजेश शुक्ला, बजरंग दल नागपूर संयोजक विशाल पुंज, प्रचार प्रसारप्रमुख निरंजन रिसालदार, मनीष मालानी, ऋषी धवन, ऋषभ अरखेल, लखन कुरील, प्रशांत मिश्र, रजनीश मिश्रा, साकेत खरे, अमित राजोरिया, सुशील चौरसिया, विकास पराते, आशू पौनिकर, अभी गुप्ता, सोनू ठाकुर, शिवाजी राऊत, दिलीप नागकुंड प्रामुख्याने उपस्थित होते.