कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे नागपूर विद्यापीठाचाही प्रभार
By आनंद डेकाटे | Updated: July 5, 2024 18:42 IST2024-07-05T18:41:41+5:302024-07-05T18:42:03+5:30
Nagpur : कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना गुरूवारी राज्यपालांनी केले निलंबित

Vice Chancellor Dr. Prashant Bokare is also in charge of Nagpur University
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना गुरूवारी राज्यपालांनी निलंबित केले. त्यानंतर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना राज्यपाल कार्यालयाकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून पदाची सूत्रे सांभाळण्याचे आदेश प्राप्त झाले. त्यामुळे डॉ. प्रशांत बोकारे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी कुलसचिव डॉ. राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल, उपकुलसचिव संजय बाहेकर,प्रदीप बिनीवाले, गणेश कुमकुमवार यांच्यासह अन्य उपस्थित होते.