उपराष्ट्रपती शुक्रवारी नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:11 AM2017-11-07T00:11:21+5:302017-11-07T00:11:36+5:30
उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचे शुक्रवारी, १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने आगमन होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचे शुक्रवारी, १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने आगमन होणार आहे. उपराष्ट्रपतींच्या हस्ते दुपारी ४ वाजता रेशीमबाग मैदानावर आयोजित ९ व्या अॅग्रोव्हिजन कार्यशाळा तसेच राष्ट्रीय प्रदर्शन आणि कॉन्फरन्सचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन समारंभानंतर सायंकाळी ६,४५ वाजता ते विशेष विमानाने भुवनेश्वरकडे प्रयाण करतील.
जिल्हाधिकाºयांनी घेतला व्यवस्थेचा आढावा.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या नागपूर दौºयासंदर्भात करावयाच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. उपराष्ट्रपती यांचे आगमन तसेच रेशीमबाग येथील अॅग्रोव्हिजन प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रम यासंदर्भात आयोजन समिती तसेच पोलीस, महसूल, विमानतळ प्राधिकरण, मिहान, आरोग्य, अन्न व औषधीद्रव्य तसेच माहिती व जनसंपर्क विभागाकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदाºयांसंदर्भात वरिष्ठ अधिकाºयांना सूचना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव, स्वागत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक हेमंत निंबाळकर,अॅग्रोव्हिजनचे रमेश मानकर, एअर इंडियाचे वसंत घोरडे, उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, रवींद्र्र खजांजी, राजभवनचे वरिष्ठ अधिकारी रमेश येवले आदी उपस्थित होते.