पीडित शेतकºयास सरकारी मदत मिळालीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:33 AM2017-11-04T00:33:13+5:302017-11-04T00:33:25+5:30

फवारणी करताना चक्कर येऊन पडलेल्या मौदा तालुक्यातील खात येथील शेतकºयाच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पीडित कुटुंबास भेट देऊन मुख्यमंत्री निधीतून ....

The victim has not received government help | पीडित शेतकºयास सरकारी मदत मिळालीच नाही

पीडित शेतकºयास सरकारी मदत मिळालीच नाही

Next
ठळक मुद्देफवारणी मृत्यूप्रकरण : आश्वासनाला दोन महिने उलटले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फवारणी करताना चक्कर येऊन पडलेल्या मौदा तालुक्यातील खात येथील शेतकºयाच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पीडित कुटुंबास भेट देऊन मुख्यमंत्री निधीतून २ लाख रुपये व वैयक्तिक ५० हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले. परंतु दोन महिने उलटूनही संबंधित शेतकºयाला मदतीपोटी एक रुपयाही मिळालेला नाही. या शेतकºयाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
शेतकरी देवराव ढोलवार यांचा मुलगा नितेश ढोलवार (२४) हा शेतात फवारणी करताना अचानक चक्कर येऊन पडला. खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नसल्याने त्यास मेयो येथे दाखल करण्यात आले. तेथे ४ सप्टेबरला त्याचा मृत्यू झाला. दरम्यान कृषी अधिकारी, तहसीलदार, तलाठी यांनी देवराव ढोलवार यांचे बयाण नोंदविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भेट देऊन मुख्यमंत्री निधीतून २ लाख व वैयक्तिक ५० हजार रुपयांची मदत देण्याचेही आश्वासन दिले होते.परंतु ढोलवार यांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नसल्याचे पवार यांनी सांगितले. या वेळी पीडित शेतकरी देवराव ढोलवार यांनी आपबिती सांगितली. पत्रकार परिषदेला नगरसेवक दुनेश्वर पेठे, अरुण वनकर, विजय शिंदे, सतीश इटकेलवार उपस्थित होते.
पीडित शेतकºयाला २२ हजाराची मदत
पत्रकार परिषदेनंतर खासदार नाना पटोले यांनी पाठविलेली ११ हजाराची वैयक्तिक मदत आणि जय जवान जय किसान संघटनेतर्फे ११ हजार रुपये अशी एकू ण २२ हजाराची रोख मदत पीडित शेतकरी देवराव ढोलवार यांना सुपूर्द करण्यात आली.
शेतकºयाची थट्टा करू नये
कीटकनाशकाच्या फवारणीमुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला. पालकमंत्री,अधिकाºयांनी घरी येऊन मदतीचे आश्वासन दिले. मात्र, दोन महिन्यांपासून एका रुपयाचीही मदत मिळाली नाही. मायबाप सरकारने मदत करता येत नसेल तर किमान संकटग्रस्त शेतकºयाची थट्टा तरी करू नये.
- देवराव ढोलवार
पीडित शेतकरी
मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर
पीडित शेतकºयाला शासकीय व खासगी मदत मिळवून देण्यासाठी आपण स्वत: पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री निधीतून मदत मिळवून देण्याचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळेल. खासगी मदत मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.
- चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री


 

Web Title: The victim has not received government help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.