नागपुरात स्वाईन फ्लूने घेतला पोलिसाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 10:09 PM2018-10-20T22:09:39+5:302018-10-20T22:10:32+5:30
शहरात स्वाईन फ्लूने डोकेवर काढले आहे. आतापर्यंत २६ रुग्णांची नोंद झाली असून चार बळी गेले आहेत. शनिवारी पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने या आजाराबाबत डॉक्टरांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात स्वाईन फ्लूने डोकेवर काढले आहे. आतापर्यंत २६ रुग्णांची नोंद झाली असून चार बळी गेले आहेत. शनिवारी पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने या आजाराबाबत डॉक्टरांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
विष्णू दौलतराव मुळे (४९) रा. नागपूर असे मृताचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, विष्णू मुळे हे नंदनवन पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून होते. २ आॅक्टोबर रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने लकडगंज येथील खासगी रुग्णालय न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शर्तीचे उपचार सुरू असताना २० आॅक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी १ वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.